Air Pollution Healthy Lifestyle News  AI Image
लाईफस्टाईल

Healthy Lifestyle : वायुप्रदूषण तुमचं शरीर पोखरतंय? 'या' आजारांचा वाढतोय धोका, काय घ्याल काळजी? जाणून घ्या

Air Pollution Healthy Lifestyle : वायुप्रदूषणाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही, तर शरीरातील पेशी आणि DNA वरही होऊ शकतो. PM2.5 सूक्ष्म कणांमुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर आजारांचा धोका कसा वाढतो?

Alisha Khedekar

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार, व्यायाम आणि झोपेकडे लक्ष देतो. मात्र, आपण दिवसभरात श्वासावाटे शरीरात घेत असलेल्या हवेचा विचार करतो का? वाढत्या वायुप्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, प्रदूषित हवेचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही, तर शरीरातील पेशी आणि DNA वरही होऊ शकतो. त्यामुळे खराब हवेचा आरोग्यावर होणारा परिणाम समजून घेणे गरजेचे आहे.

हवेत धूळ, धूर आणि अनेक विषारी सूक्ष्म कण असतात. यामध्ये PM2.5 या अतिसूक्ष्म कणांचा विशेष धोका असतो. हे कण इतके लहान असतात की श्वास घेताना फुफ्फुसांच्या आतील भागापर्यंत पोहोचू शकतात. काही कण रक्तप्रवाहातही प्रवेश करू शकतात. त्यामुळे त्यांचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवरही होण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत DNA असते. शरीराची वाढ, पेशींची निर्मिती आणि त्यांचे योग्य कार्य यासाठी DNA महत्त्वाचे असते. मात्र, प्रदूषणातील हानिकारक कणांमुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज वाढू शकते. याचा परिणाम पेशींवर होतो. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यास DNA चे नुकसान होण्याचा आणि त्याच्या कार्यपद्धतीत बदल होण्याचा धोका वाढू शकतो.

दीर्घकाळ वायुप्रदूषणाच्या संपर्कात राहिल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. काही संशोधनांमध्ये प्रदूषणाचा संबंध फुफ्फुसांच्या कर्करोगाशीही जोडण्यात आला आहे. गर्भवती महिलांसाठीही प्रदूषित हवा धोकादायक ठरू शकते. त्यामुळे बाळाचा जन्म वेळेआधी होणे आणि त्याच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

वायुप्रदूषण पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी काही सवयींमुळे त्याचा संपर्क कमी करता येतो. हवेची गुणवत्ता खराब असताना विनाकारण बाहेर जाणे टाळा. बाहेर पडताना योग्य फिटिंगचा N95 मास्क वापरा.घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर करू शकता. तसेच प्रदूषण जास्त असताना मोकळ्या जागेत व्यायाम करणे टाळा. लक्षात ठेवा, प्रदूषणाचा परिणाम लगेच दिसून येत नसला तरी दीर्घकाळात तो आरोग्यासाठी गंभीर ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : चेहऱ्यावर हवा आहे नैसर्गिक ग्लो? रोज खा हे ५ पदार्थ, त्वचा दिसेल चमकदार

Maharashtra News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग

Makeup Tips: महागड्या ब्लशला विसरा! बीटापासून घरीच बनवा नॅचरल ब्लश, गाल दिसतील गुलाबी

Traffic : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर ५ ते ६ किलोमीटरच्या रांगा, मुंबई - गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडी

प्रशासनात मोठा भूकंप! 12 IPS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या; कोणाची कोणत्या जिल्हयात नियुक्ती?

SCROLL FOR NEXT