AIIMS Delhi Jobs Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

AIIMS Delhi Jobs Recruitment 2023 : तरुणांसाठी खुशखबर! सरकारी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी, ३ हजार जागा रिक्त, कसा कराल अर्ज?

AIIMS Job Vacancy : एम्समध्ये दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी तीन हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

कोमल दामुद्रे

AIIMS Recruitment 2023:

सरकारी खात्यात नोकरीचे स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एम्स दिल्लीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. एम्समध्ये दहावी आणि बारावी पास तरुणांसाठी तीन हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

या रिक्त पदांची भरती नॉन टिचिंग पदांसाठी असणार आहे. यासाठी तुम्हाला एम्सच्या अधिकृत साइट्सला भेट द्यावी लागेल. यासाठी उमेदवार aiimsexams.ac.in च्या साइट्सवर जाऊन अर्ज भरु शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एम्समध्ये जॉब (Job) करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी आवश्यक पात्रता किती? शिक्षण मर्यादा किती? आणि पगार (Salary) किती मिळेल? जाणून घेऊया सर्व

एम्समध्ये केली जाणारी भरती ही नॉन टिचिंग स्टाफसाठी असणार आहे. यामध्ये एकूण ३०३६ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी अंतर्गत ही भरती प्रक्रिया असेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत साइट्सला (Websites) भेट द्यावी लागेल.

अर्ज करताना त्यासोबतच परीक्षा शुल्क देखील भरावा लागणार आहे. या परीक्षेसाठी ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी तीन हजार फी असणार आहे. तर एसी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासोबत २४०० रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही १ डिसेंबर, २०२३ आहे. याचे प्रवेशपत्र १२ डिसेंबर रोजी जारी केले जाईल तर परीक्षा १८ आणि २० डिसेंबरला सर्व प्रमुख शहरांमध्ये होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला विश्वचषकात भारताचा विजय, जेमिमा रॉड्रिग्ज वडिलांना मिठी मारून रडली, मुंबईच्या लेकीचा भावुक क्षणाचा VIDEO

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - चिपळूणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक

Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री; दिग्रसकरांच्या कुटुंबावर मोठे संकट, पाहा VIDEO

Pav Bhaji Recipe: मुंबई स्टाईल चमचमीत पावभाजी कशी बनवायची?

Ladki Bahin Yojana: ऑक्टोबर संपला, तरीही हप्ता आला नाही, लाडकीला ₹१५०० कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT