एआय व्हॉईस क्लोनिंग फसवणुकीपासून स्वतःचा बचाव कसा करावा
झोहो CEO श्रीधर वेंबू यांनी सुचवलेला मौखिक पासवर्ड काय आहे
मौखिक पासवर्ड एआय व्हॉईस स्कॅमपासून कसा बचाव करू शकतो
एकीकडे एआयमुळे अनेक कामे सुलभ होत आहेत, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार एआयच्या शक्तीचा गैरवापर करत आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर ठग अनेकांना गंडा घातलत आहेत. एआय व्हॉईसच्या मदतीने सायबर गुन्हेगार एखाद्याचा अचूक आवाज बनवून लोकांची फसवणूक करत आहेत. सायबर ठग बनावट आवाज देऊन पैसे किंवा क्रेडिट कार्डची माहिती मिळवतात आणि बँक खात्यातील पैसे लंपास करतात.
भारतीय तंत्रज्ञान कंपनी झोहोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीधर वेंबू यांनी या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय सुचवला आहे. त्यांनी एका युझरच्या पोस्टचा हवाला देत सांगितलं की, एआयच्या युगात, आपल्या परिचितांमध्ये एक मौखिक पासवर्ड सेट करण्याची वेळ आलीय. जेणेकरून कोणताही सायबर गुन्हेगार तंत्रज्ञानाचा वापर करून आपली फसवणूक करू शकणार नाही.
खरं तर, श्रीधर वेंबू यांनी ज्या युझरच्या पोस्टवर कमेंट केली आहे त्याने एक्स वर एक धक्कादायक घटना शेअर केली आहे. युझरने सांगितले की, त्याला एक फोन आला होता, त्यात त्याच्या पत्नीच्या आवाज होता. त्याला फोनवर सांगण्यात आले की ती तिची घरी पर्स विसरलीय आणि पेट्रोल घेण्यासाठी क्रेडिट कार्डची आवश्यकता असल्याचं सांगितलं. युझरने आपली आपबीती सांगता म्हणाला की, आवाजात थोडा फरक होता परंतु तो त्याच्या पत्नीच्या आवाजासारखा वाटत होता. परंतु सुदैवाने त्यावेळी पत्नी त्याच्यासोबत घरी होती आणि जर पत्नी त्याच्यासमोर नसती तर तो सहजपणे या फसवणूकीचा बळी पडू शकला असता.
एआयच्या मदतीने अशा प्रकारच्या फसवणूकीबद्दल झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी लिहिले की, आता वेळ आली आहे की आपण आपल्या जवळच्या आणि मित्रांसाठी वर्बल पासवर्ड ठेवण्याची. आज एआय इतकं प्रगत झालं की त्यात खरा आणि बनावट असा फरक करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, जर कोणी जवळचा किंवा मित्र म्हणून पैसे मागितले तर त्याने आधी निश्चित केलेला पासवर्ड विचारला पाहिजे.
श्रीधर वेंबू यांच्या मते, आपण आपले पालक, भागीदार, मुले आणि मित्रांसह मौखिक पासवर्डच्या स्वरूपात असे शब्द ठरवले पाहिजेत. जे आपण फोन कॉल किंवा इतर काही डिजिटल मार्गाने एकमेकांकडे पैसे मागल्यावर त्यांना सांगाल. अशा स्थितीत जर तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा कुटुंबातील सदस्याचा फोन आला आणि आपत्कालीन परिस्थितीत तुमच्याकडून पैसे मागितले गेले, तर तुम्ही त्यांना तुमचा निश्चित पासवर्ड विचारू शकता. हे काहीही असू शकते, जे तुम्हाला तुमच्या जाणकाराला आठवते परंतु त्याबद्दल इतर कोणालाही माहित नसते. तुम्ही विचारल्यावर जर समोरची व्यक्ती तुम्हाला पासवर्ड सांगू शकत नसेल, तर ताबडतोब फोन बंद करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.