Stroke Symptoms Saam tv
लाईफस्टाईल

Stroke risk reduction: छोटी चूक ठरू शकते जीवघेणी! तुमच्या 'या' 5 सवयी टाळू शकतात स्ट्रोकचा धोका

Stroke prevention habits: स्ट्रोक हा आजार अचानक होतो आणि जीवघेणा ठरू शकतो. मात्र, काही साध्या सवयी अंगीकारल्यास स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

जर तुमच्या मेंदूला अपुऱ्या प्रमाणत रक्तपुरवठा होत असेल तर तुम्हाला स्ट्रोक येण्याचा धोका अधिक असतो. प्रौढ वयोगटातील लोकांना स्ट्रोकनंतर अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागू शकतो. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणं किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं या दोन कारणांमुळे स्ट्रोक येण्याचा धोका असतो. हे टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याच्या धोक्यांपासून स्वतःचं रक्षण करणं.

स्ट्रोकची लक्षणं काय आहेत?

  • चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणं

  • बोलण्यात अडचण किंवा अस्पष्ट शब्द

  • धूसर दिसणं

  • कोणत्याही कारणाशिवाय तीव्र डोकेदुखी होणं

या धोक्यांपासून करा स्वतःचा बचाव

उच्च रक्तदाब

हाय ब्लड प्रेशर हे स्ट्रोकचं सर्वात सामान्य कारण मानलं जातं. वृद्धांमध्ये उच्च रक्तदाब स्ट्रोकचा धोका चार पटीने वाढवू शकतो. तो योग्य मर्यादेत आणण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल.

धुम्रपान

सिगारेट ओढल्याने मेंदूतील ब्लॉकेजचा धोका दुप्पट होतो. त्याचप्रमाणे रक्तस्त्राव होण्याचा धोका चौपट वाढतो. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या कॅरोटिड धमनीमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होऊ शकतं. यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

हृदयाचे आजार

कोरोनरी धमनी डिसीज, अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयाच्या चेंबरचा आकार वाढल्याने रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. ज्यावेळी या गुठळ्या फुटतात तेव्हा त्या रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतात किंवा मेंदूपर्यंत जाऊ शकतात. म्हणून हृदयाचे आरोग्य जपणं गरजेचं आहे.

पूर्वी आलेला स्ट्रोक

जर एखाद्याला यापूर्वी स्ट्रोक येऊन गेला असेल तर स्ट्रोक न झालेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक धोका असतो. स्ट्रोकनंतर तुमच्या मेंदूची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

कोलेस्ट्रॉल

लो डेंसिटी लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल किंवा एलडीएल रक्तप्रवाहातून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतं. एलडीएलचं प्रमाण जास्त झालं तर रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्या हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्यासाठी एक प्रमुख कारण मानलं जातं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार; भाजप सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: मराठा अभ्यासक आणि सरकारच्या शिष्टमंडळमध्ये चर्चा सुरू

Shocking: पैशांच्या हव्यासापोटी आईनेच केली पोटच्या दोन मुलांची विक्री, तिघांना अटक; प्रियकर फरार

SCROLL FOR NEXT