pythia's oasis saam tv
लाईफस्टाईल

समुद्राच्या तळाशी सापडलं एक रहस्यमयी छिद्र; यामधून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थाने वैज्ञानिकही हैराण

नुकतंच एक गोष्ट समुद्राच्या आत सापडली असून वैज्ञानिक याचा शोध घेत आहेत. वॉशिंग्टन विद्यालयातील संशोधकांनी या रहस्यमयी छिद्राबाबत माहिती मिळवली असून ते अमेरिकेच्या ओरेगनच्या तटाशी सांगितलंय.

Surabhi Jayashree Jagdish

जगभरात अनेक रहस्य आहेत आणि या रहस्यांमध्ये अनेक रहस्य अशी आहेत, ज्यांचा उलगडा अजून होऊ शकलेला नाही. असंच समुद्राच्या खोलीमध्येही अनेक रहस्य असल्याचा दावा करण्यात येतो. अनेकदा समुद्रातून अशा जीवांची माहिती मिळते, ज्यामुळे वैज्ञानिक देखील हैराण आहेत. असंच नुकतंच एक गोष्ट समुद्राच्या आत सापडली असून वैज्ञानिक याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्राच्या खोलीतून एक मोठ छिद्र असल्याचं समोर आलं आहे. या छिद्रातून सतत गळती होत असल्याचं दिसून आलंय. मात्र अजूनही वैज्ञानिक याची रचना समजू शकलेले नाहीत. वॉशिंग्टन विद्यालयातील संशोधकांनी या रहस्यमयी छिद्राबाबत माहिती मिळवली असून ते अमेरिकेच्या ओरेगनच्या तटाशी सांगितलंय.

छिद्रातून गळती होत असल्याचा दावा

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या खोल तळाशी असलेल्या या छिद्रातून द्रवाची गळती होतेय. या क्षेत्रामध्ये भूकंपाचं प्रमाण अधिक आहे, या कारणामुळे हे छिद्र लीक होत आहे. याला सध्या पायथियास ओएसिस हे नाव देण्यात आलं आहे. दुसरी हैराण करणारी गोष्ट म्हणजे या छिद्राच्या आत कोणतीही गोष्ट जाऊ शकत नाही. मात्र यामधून एक द्रव पदार्थ बाहेर पडत असून त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

संशोधकाच्या म्हणण्यानुसार, हे छिद्र 2015 मध्येच सापडलं होतं मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे वैज्ञानिक काहीसे उत्सुक आहेत. या छिद्रातून बाहेर पडणारा द्रव पदार्थ म्हणजे पाणी नसून दुसरं काहीतरी असल्याचा दावा करण्यात येतोय.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर इव्हान सोलोमन यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमने या छिद्राची आत जाऊन तपासणी केली, पण ते मिथेनचे बुडबुडे नव्हते, तर समुद्राच्या तळातून फायरहोज सारखं पाणी बाहेर येताना दिसलं. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणाहून येणारा द्रव पदार्थ समुद्राच्या पाण्याच्या तुलनेत गरम असल्याचं आढळलंय.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

MP News : भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलीचं निधन, कुटुंबासह पक्षावर शोककळा

Shocking : धक्कादायक! बंद खोलीत आई मुलासह आढळला काकाचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Laxman Hake: ...तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर करा, लक्ष्मण हाकेंचे चिथावणीखोर वक्तव्य

SCROLL FOR NEXT