Health Lifestyle News  AI Image
लाईफस्टाईल

Brain Health : तुमचा मेंदू हळूहळू कमकुवत होतोय? 'या' ९ सवयी आजच बदला; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Brain Healthy Lifestyle News : मेंदू निरोगी आणि स्मरणशक्ती चांगली ठेवायची असेल तर आहार, झोप आणि जीवनशैलीकडे लक्ष द्या. मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या या सवयी वेळीच बदला.

Alisha Khedekar

आपण निरोगी राहण्यासाठी आहार, व्यायाम आणि शरीराची काळजी घेण्यावर भर देतो. मात्र, शरीरासोबतच मेंदूचे आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विचार करणे, निर्णय घेणे, आठवण ठेवणे, बोलणे आणि शरीराच्या हालचाली नियंत्रित करणे अशी अनेक महत्त्वाची कामे मेंदू करतो. त्यामुळे मेंदू निरोगी राहण्यासाठी रोजच्या जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयींचा मेंदूच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे, या सवयींचे दुष्परिणाम लगेच जाणवत नाहीत. मात्र, दीर्घकाळ चुकीची जीवनशैली कायम राहिल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया अशाच काही सवयी.

सकाळचा नाश्ता न केल्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषण मिळण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करणे फायदेशीर ठरते. तसेच भूक नसतानाही सतत खाण्याची सवय वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणजेच काय तर,संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात खाणे मेंदूसह संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त रात्री उशिरापर्यंत जागणे आणि अपुरी झोप घेणे यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दररोज पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.

झोपताना सुद्धा जर तुम्ही खूप घट्ट कपडे, मोजे किंवा गळ्याभोवती आवळणारे कपडे घालत असाल तर टाळणे योग्य राहील. यामुळे अस्वस्थता निर्माण होऊन झोपेवर परिणाम होऊ शकतो. धूम्रपानाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही, तर मेंदूच्या आरोग्यावरही होतो. त्यामुळे ही सवय सोडणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सतत बोलणे, विनाकारण वाद घालणे किंवा प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे. त्याने मेंदूवर आणि एकंदरीत शरीरावर चांगले परिणाम होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फटाके वाजवीत सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या नादात वसईत तरुण गंभीर जखमी

MI Captain : मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण? रोहित शर्मासह ४ जण शर्यतीत...कुणाच्या गळ्यात पडणार नेतृत्वाची माळ?

स्वप्नात वारंवार साप दिसतोय; काही संकेत मिळतात का? खरंच त्यात तथ्य आहे का?

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुहागरसह ३ समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार, यादीत प्रथम स्थान

Winter Diet : हिवाळ्यात कोणत्या पिठाची भाकरी खाणे ठरते फायदेशीर? बाजरी, मका की नाचणी? जाणून घ्या 5 पिठांचे खास फायदे

SCROLL FOR NEXT