Makeup Sins Saam Tv
लाईफस्टाईल

Makeup Sins : मेकअप करताना या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, त्वचेला होणार नाही नुकसान

5 Mistake During Makeup Which can harm your skin : रोज मेकअप केल्याने त्वचेचे नुकसान होते. यामुळे चेहऱ्यावर मुरुम किंवा त्वचा खराब होते. जर तुम्ही देखील मेकअप करत असाल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे त्वचेचे नुकसान होणार नाही.

कोमल दामुद्रे

Beauty Hacks :

सुंदर दिसण्यासाठी आपण चेहऱ्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करत असतो. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा असतो मेकअप. चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक केमिकल उत्पादनाचा वापर करतो. ज्यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसतो.

या उत्पदनाचा केवळ महिलांच (Women) नाही तर पुरुष देखील वापर करतात. आपला लूक वेगळा किंवा चांगला बनवण्यासाठी मेकअपचा वापर करतात. परंतु, रोज मेकअप केल्याने त्वचेचे नुकसान होते. यामुळे चेहऱ्यावर मुरुम किंवा त्वचा खराब होते. जर तुम्ही देखील मेकअप करत असाल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे त्वचेचे (Skin) नुकसान होणार नाही.

1. ड्राय त्वचेचवर मेकअप

मेकअप करताना सगळ्यात मोठी चूक की, त्वचा कोरडी असणे. यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. ज्यामुळे त्वचेचा खराब होईल. मेकअप करण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझर करा आणि प्राइमर वापरा. तसेच त्वचेला सनस्क्रीन लावायला विसरु नका.

2. स्वच्छ मेकअप किट

मेकअप करताना आपण ब्युटी ब्लेंडर, मेकअप ब्रश इत्यादींचा वापर करतो. परंतु, ते स्वच्छ (Clean) नसल्यास त्वचेवर बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. ज्यामुळे मुरुमाची समस्या उद्भवू शकते. त्यासाठी ब्युटी ब्लेंडर किंवा ब्रश आठवड्यातून एकदा स्वच्छ करावा.

3. फाउंडेशन

हाय कव्हरेज फाउंडेशन असेल तर तुमचा चेहरा चांगला दिसतो परंतु, रोज लावल्याने त्वचेला नुकसान होते. नियमित वापरल्याने त्वचेच्या छिद्रात ते अडकते. यापेक्षा सनस्क्रिनचा वापर करा. ज्यामुळे त्वचेचे संरक्षण होईल.

4. मेकअप करुन झोपणे

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढून झोपणे गरजेचे आहे. असे न केल्याने रक्तसंचय होण्याची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे त्वचेची छिद्रे ब्लॉक होऊ लागतात. त्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

5. वाइप्सचा वापर

अनेकदा मेकअप साफ करण्यासाठी मेकअप वाइप्सचा वापर केला जातो. परंतु, यामुळे त्वचेचे नुकसान होते. मेकअप वाइप्सचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडते, त्वचेवर जळजळ होते. तसेच मुरुमांची समस्या देखील होऊ शकते. मेकअप काढण्यासाठी क्लिंजिंग बामचा वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT