Vaishnavi Hagawane Case Inside Story Saam Tv
Image Story

Vaishnavi Hagawane: प्रेमविवाह, लग्नात ५१ तोळं सोनं, फॉर्च्युनर गिफ्ट; तरीही वैष्णवी हगवणेची हत्या का झाली? इनसाइड स्टोरी फोटोमधून घ्या समजून

Vaishnavi Hagawane Case: मुळशी येथील वैष्णवी हगवणेची हत्या झाली आहे. सासरच्यांनी वैष्णवीला जबरदस्त मारहाण केली. याआधीही वैष्णवीने एकदा जीव देण्याचा प्रयत्न केला होता.

Siddhi Hande
Vaishnavi Hagawane Case Inside Story

मुळशी तालुक्यातील भुकूम येथील वैष्णवी हगवणेची हत्या झाली आहे. सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचे बोलल जात होते. वैष्णवीने आत्महत्या नव्हे तर तिचा खून केला आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

वैष्णवी हगवणे ही राजेंद्र हगवणेची सून आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे पदाधिकारी होते. या प्रकरणानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा नवरा, सासू आणि नंणदेला अटक करण्यात आले आहे. तर दुसरा मुलगा आणि सासरे फरार आहेत.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

वैष्णवी आणि शशांक यांचं लग्न २८ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात झाले होते. या लग्नात लेकीसोबत तिच्या वडिलांनी ५१ तोळं सोनं, चांदी आणि फॉर्च्युनर कारदेखील दिली होती.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

लग्नानंतर काही दिवसातच तिच्या कुटुंबियांनी तिला त्रास द्यायला सुरु केला. माहेराहून चांदीची भांडी, पैसे आणण्याची मागणी केली.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती होती. तेव्हा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊ तिला मारहाण केली. तिच्या सासूने, नणंदेनेदेखील तिला मारहाण केली.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

२७ नोव्हेंबर २०२३ रोजी वैष्णवीने जीव द्यायचा प्रयत्न केला. तिने विष घेतले होते. यातून ती वाचली. त्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवले.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होते.पैसे न दिल्यावर तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तिला माहेरी सोडले.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

१६ मे रोजी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या नवऱ्याने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या. तिच्या सासरच्यांनी तिला मारहाण केली असल्याचे वैष्णवीचे वडील कस्पटे यांनी सांगितले.

Vaishnavi Hagawane Case Inside Story

आता वैष्णवीच्या १० वर्षांच्या मुलाला त्याच्य आजी-आजोबांकडे सूपूर्त करण्यात आले आहे. वैष्णवीनंतर या बाळाचा सांभाळ त्याचे आजी-आजोबा करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Paneer Bowl: वर्कआउटनंतर काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक हवंय? मग 'हेल्दी पनीर बाउल' नक्की खा!

Maharashtra Live News Update : श्री क्षेत्र नारायणपूर येथे गुरु पौर्णिमेनिमित्त लाखो भक्तांची दर्शनासाठी उपस्थिती

Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

Ind Vs Eng : कृष्णा आउट, बुमराह इन! लॉर्ड्स कसोटीसाठी टीम इंडियामध्ये फक्त १ बदल

सततच्या कामाच्या धावपळीमुळे त्रासला आहात? 'या' पदार्थाचे सेवन करा अन् बघा फायदे

SCROLL FOR NEXT