big growthसध्या विमान प्रवास करणाऱ्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. मात्र अनेकांसाठी विमान प्रवास हा पहिल्यांदा असतो.
Flight Travelingविमान प्रवास करताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो, मात्र आज आपण पहिल्यांदा विमान प्रवास करतानाच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती घेणार आहोत.
ageचला तर आज आपण पाहूयात लहान असो वा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती, जर पहिल्यांदा विमान प्रवास करणार असाल तर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
Book ticketsपहिल्यांदा विमानाचे तिकीट बुक करणे अनेकांसाठी नवीन असते. त्यामुळे तिकीट बुक करताना अधिक किंमतीत तिकीट बुक करतात मात्र पहिल्यांदा विमानाचे तिकिट बुक करण्याआधी अनेक साईटवरुन तिकीटाची किंमत तपासून मगच तिकीट बुक करावे.
more moneyअनेकांना सामान अधिक असेल तर पैसे भरावे लागतात या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती नसते. मग ऐन वेळी सामान जास्त झाल्यास काय करावे हे टेंशन येते. त्यामुळे पहिल्यांदा विमान प्रवास करताना सामान अधिक घेऊन जायचे असल्यास जवळ अधिक पैसे ठेवावेत.
Two hours agoअनेकजण असे असतात की प्रवाशाला जाताना त्यांना कायम उशीर होतो, मात्र विमानातून तुम्ही बाहेर गावी जाणार असल्यास तुम्हाला विमान तळावर साधारण दोन तासांआधीच विमानतळावर पोहचावे लागते.
Inspection विमान प्रवास करताना अनेक सुरक्षित गोष्टींची तपासणीही प्रत्येक प्रवाशाला करावी लागते. मात्र अनेकांना हे माहिती नसते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवावी.