मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहेत. याचदरम्यान, एक दुर्घटना घडली आहे.
मुसळधार पावसाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. या मुसळधार पावसादरम्यान ग्रँट रोड परिसरात एका इमारतीचा स्लॅब आणि बाल्कनी कोसळल्याची घटना घडली आहे.
या बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनेमुळे इमारतीमधील नागरिकांची एकच धावाधाव झाली.
ग्रँट रोड परिसरात रुबिनिसा मंजिल इमारतीची बाल्कनी कोसळल्याची घटना घडली.
या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनी आणि स्लॅबचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत.
इमारतीच्या बाल्कनी आणि स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. या इमारतीला म्हाडाने नोटीस बजावली होती.
इमारती बाल्कनी आणि स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या जवानांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने मदतकार्याला सुरुवात केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.