New Labour Law India google
Image Story

Labour Code Explained: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार, Full & Final आणि कर्मचाऱ्यांचे हक्क एका क्लिकमध्ये समजून घ्या

Salary Rules : नवीन कामगार कायद्यानुसार पगार 7 तारखेपर्यंत, नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, थकीत वेतनासाठी 3 वर्षांपर्यंत दावा आणि सॅलरी स्लिप अनिवार्य अशा महत्त्वाच्या नियमांची माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav
Labour Code Explained

महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार देणे बंधनकारक

नवीन नियमांनुसार नियोक्त्यांनी महिना संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत कर्मचाऱ्यांचा पगार जमा करणं गरजेचं आहे. यामुळे पगार उशिरा मिळण्याच्या समस्येत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे.

New Labour Law India

रोजंदारी, साप्ताहिक आणि पंधरवाड्याच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम

रोजंदारीवर काम करणाऱ्यांना शिफ्ट संपताच सॅलरी द्यावे लागेल. साप्ताहिक कर्मचाऱ्यांना सुट्टीपूर्वी, तर पंधरवड्याच्या कर्मचाऱ्यांना २ दिवसांच्या आत पगार मिळणं अनिवार्य असेल.

New Labour Law India

नोकरी सोडल्यानंतर २ दिवसात सेटलमेंट

राजीनामा दिल्यानंतर किंवा नोकरी संपल्यानंतर कंपनीने २ कामकाजाच्या दिवसांत Full & Final सेटलमेंट करणं आवश्यक असेल. यामुळे कर्मचाऱ्यांना महिनोनंमहिने पैसे अडकवून राहणार नाहीत. Salary Payment Rules India

Salary Payment Rules India

थकीत वेतनासाठी ३ वर्षांपर्यंत दावा करता येणार

नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना थकीत पगारासाठी ३ वर्षांपर्यंत दावा करण्याची संधी मिळेल. याआधी हा कालावधी वेगवेगळ्या कायद्यांनुसार ६ महिने ते २ वर्षांपर्यंत मर्यादित होता.

Salary Payment Rules India

सॅलरी स्लिप देणेही झाले बंधनकारक

कंपनीने पगार जमा करण्याआधी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक सॅलरी स्लिप देणे गरजेचे आहे. त्यामुळे पगाराची माहिती जास्त पारदर्शक आणि स्पष्ट होईल.

Full and Final Settlement Rules

पगार न मिळाल्याने कुठे कराल तक्रार?

पगार उशिरा मिळाल्यावर किंवा विनापरवानगी कपात झाल्यावर कर्मचारी निरीक्षक-सह-सुविधा अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात. प्रकरण न सुटल्यास औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करता येईल आणि गरज पडल्यास प्रशासनाकडून थकीत रक्कम वसूल केली जाऊ शकते.

Full and Final Settlement Rules

टीप: वरील माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि लागू होण्याबाबत अधिकृत सरकारी अधिसूचना किंवा संबंधित प्राधिकरणाकडून माहिती तपासून घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: पंतप्रधानांचा माफीनामा ते प्रधानांचा राजीनामा...राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे

शेतकरी कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार, बँक खात्यात कधीपर्यंत येणार पैसा? सरकारनं सांगितली संपूर्ण प्रक्रिया

Eye Health : डिम लाईटमध्ये पुस्तक वाचण्याची सवय ठरू शकते धोकादायक, हे ८ तोटे वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Karjat Fort : प्राचीन व्यापारी मार्गांचा पहारेकरी, १२०० फूट उंचीवर कर्जतजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Maharashtra News Live Update: रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या जमीन अर्जावर आज कोर्टात 3 तास सुनावणी

SCROLL FOR NEXT