Manoj Jarange Patil Mumbai March: Massive Crowd Gathers Along The Route saam tv
Image Story

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

Manoj Jarange Patil’s Convoy Draws Huge Crowd : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या ताफ्याच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक आणि मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली असून पाटोदा येथेही स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. अंतरवाली सराटीतील आपले उपोषण सुरुच ठेऊन ते रुग्णवाहिका आणि दोन गाड्यांसह मुंबईकडे निघालेत. त्यांच्या सोबतीला मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होत आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारलीय. तरीही ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळेच ते मुंबईकडे रवाना झालेत.

जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोद्यात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी पाटोद्यात करण्यात आलीय.

पाटोदा नगरीमध्ये सामाजिक जातीय सलोख्याचे दर्शन पाहायला मिळाले आहे वंजारी समाजाचे नेते विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनाला वंजारी समाजाचा पाठिंबा दिलाय.

मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान 14 तर पाटोदा शहरात 11 मोठे अन्नछत्र उभारण्यात आले आहे. 25 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईकडे मार्गस्थ झालाय. बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे. याच ताफ्यात मोठ्या संख्येने मनोज जरांगे समर्थक सहभागी झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे हाच ताफा दाखल झाला असताना ताफ्याची ड्रोन दृश्य व्हायरल झाली आहेत. येथे मोठ्या संख्येने मराठा बांधव दिसून येत आहेत.

आता, रात्रीची काही दृश्ये समोर आली असून गेवराई जवळील पाडळसिंगी टोल नाक्यावर मोठ्या संख्येने मराठा बांधव दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

पाकिस्तानातही गणपती बाप्पा मोरया, कराचीत मराठी माणसाच्या बाप्पाची चर्चा

महाराष्ट्र सर्वात मोठं बहुभाषिक राज्य, शाहांच्या विधानावरून वाद पेटला

Britain News: देशाचे तीन भागात होणार विभाजन; नेत्यांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या

SCROLL FOR NEXT