Image Story

माउंट अगुंग ज्वालामुखी

विकास माने

करंगसेम (बाली) - इंडोनेशियातील बाली येथे माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने वातावरणात प्रचंड धूर आणि राखेचे ढग पसरले आहेत. बाली बेटावर सरकारने अतिदक्षतेचा इशारा दिला आला आहे. ज्वालामुखीतून निघालेल्या राखेमुळे विमान वाहतुकीला 'रेड वॉर्निंग' देण्यात आली आहे. या ज्वालामुखीचा आठवड्यातला हा दुसरा उद्रेक असून, माउंट अगुंगमधून निघालेल्या राखमिश्रित धुराचे ढग 4000 मीटर (13,100 फूट) उंचीवर गेले आहेत. बाली बेट हे जगातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. बालीमधील सेमिन्याक आणि कुटा ही मुख्य पर्यटनस्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे ज्वालामुखीपासून 70 किलोमीटर अंतरावर आहेत. राखेचे ढग सध्या बाली बेटाच्या पूर्वेकडील लोम्बोक बेटाकडे सरकत आहेत. त्यामुळे येथील मुख्य विमानतळ पूर्णतः बंद करण्यात आले आहे. या ज्वालामुखीच्या तोंडाजवळ आता मॅग्मा म्हणजे वितळलेले खडक दिसू लागल्याचे भूगर्भतज्ज्ञांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT