ओरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार झुल्फीकार खान याने मराठ्यांची राजधानी किल्ले रायगडला वेढा घातला.
हिंदवी स्वराज्याच्या तख्ताची जागा म्हणजे रायगड किल्ला होता. हा किल्ला अतिशय मजबूत होता. कोकणात त्याच्या तोडीचा दुसरा किल्ला नव्हता.
या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांची बादशाही छावणीत हत्या करण्यात आली. संभाजीराजांच्या हत्येच्या घटनेने सर्व स्वराज्य नेतृत्वहीन झालं होतं. शत्रूस मिळालेल्या या अपूर्व विजयामुळे स्वराज्यावर भयानक संकट कोसळलं.
छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी येसूबाई राणीसाहेब आणि मुलगा शिवाजी रायगडावर आहेत हे कळल्यानंतर औरंगजेबाने झुल्फीकार खानास रायगडी पाठवलं होतं.
झुल्फिकार खान याने आपल्या मदतीला कोकणातून जंजिर्याच्या हबशीस बोलावून २५ मार्च १६९० मध्ये रायगडाला मोर्चे लावले.
रायगडाबाहेर मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या. राजेंच्या मृत्यूनंतर गडावरील मंडळी आणि राजकुटुंबात भीषण दुःखाची छाया पसरली होती. येसूबाई राणीसाहेबांच्या दुःखाला तर सीमाच नव्हती मात्र तरीही दुःखाला आवर घालून येसूबाई राणीसाहेबांनी नेटाने किल्ला लढवला.
छत्रपती राजाराम महाराज जिंजीला तर येसूबाई राणीसाहेब रायगडावर अडकून होत्या. यावेळी मुघलांनी फंदफितुरीच्या मार्गाने अनेक किल्ले, अनेक ठाणी हस्तगत केली. तरीसुद्धा महाराणी येसूबाई यांनी रायगड दहा महिने किल्ला लढवला.
रायगड हा किल्ली पाच सहा वर्ष गड सहज लढवता आला असता . परंतु मुघलांनी भेद नीतीचा वापर केला. यामध्येच बाहेरून मदत न मिळाल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
येसूबाई राणीसाहेब रायगडावर रोजचा राज्यकारभार, पत्रव्यवहार, देणीघेणी, किल्ल्यावरच्या गडकऱ्यांना आणि सरदारांना धीर देणं, जिथे शिबंदी कमी पडेल तिकडे ती वेळेत पाठवणं आणि रायगडाचा घास घेऊ पाहणाऱ्या झुल्फीकार खानाचे आक्रमण थोपवणं ही कामं येसूबाई रााणीसाहेब गडावर पहात होत्या.
३ नोव्हेंबर १६८९ रोजी रायगडासह येसूबाई राणीसाहेब आणि शाहूराजे मुघलांच्या स्वाधीन झाले. ही माहिती महाराणी येसूबाई राणीसाहेब या पुस्तकातून घेण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.