Joint Pain  Social Media
Image Story

Heatlh Tips: सांधेदुखीने त्रस्त आहात? घरीच करा हे ५ उपाय, झटक्यात मिळेल आराम

Home Remedies For Joint Pain : सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त असणाऱ्यांनी डॉक्टरकडे जाण्याऐवजी काही घरगुती उपाय करावे. यामुळे त्यांना अवघ्या काही मिनिटांत आराम मिळेल. कसे ते घ्या जाणून...

Priya More
Joint Pain

वाढत्या वयाबरोबर सांध्यातील कमकुवतपणा ही एक सामान्य गोष्ट आहे. पण तारुण्यातही तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर हे लक्षण आहे की तुमची हाडे कमकुवत होत आहेत.

Joint Pain

बदलत्या जीवनशैलीमुळे सांधेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे जीवनशैली सुधारण्याची गरज आहे. सांधेदुखीवर अनेक औषधे आणि तेल उपलब्ध असले तरी काही सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

Joint Pain

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

Joint Pain

यासाठी एक ग्लास गरम दुधात एक चमचा हळद मिसळून प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते. हे रोज सकाळी प्यायल्याने आराम मिळतो.

Joint Pain

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधेदुखी कमी होते.

Joint Pain

आल्याचा चहा बनवल्यास किंवा आल्याचे तुकडे पाण्यात उकळून प्यावे. तुम्ही आल्याची पेस्ट बनवून प्रभावित भागात लावू शकता.

Joint Pain

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल यांचे मिश्रण लावल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. हे मिश्रण शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

Joint Pain

एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करा आणि दुखणाऱ्या भागात मसाज करा. असे रोज केल्यास फायदा होईल.

Joint Pain

गरम पाण्याचा फोमेंटेशन हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. एक स्वच्छ कापड कोमट पाण्यात भिजवा ते पिळून घ्या आणि वेदनादायक भागावर लावा. हे रक्ताभिसरण वाढवते आणि सूज कमी करण्यास मदत करते.

Joint Pain

याव्यतिरिक्त गरम पाण्यात मीठ भरलेले कापड टाका आणि त्याने पायाला किंवा प्रभावित भागाला शेक द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT