साबुदाणा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. उपवासाला साबुदाणा खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा दूर होतो आणि दिवसभर शरीराला ताकद मिळण्यास मदत होते.
अनेजण साबुदाण्याची खीचडी, बटाट्याची भाजी, खीर खाऊन कंटाळले असतील. हे पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकदा असिडिटी किंवा अपचनची समस्या होण्याती शक्यता असते.
अशा परिस्थितीमध्ये श्रावणातील उपवासाला साबुदाण्याची खिचडी बनवण्यापेक्षा साबुदाण्याची रबडी नक्की ट्राय करा. हा पदार्थ खाल्लयामुळे तुमच्या घरातील सदस्य देखील खुश होतील.
चला तर जाणून घेऊया उपवासाची साबुदाण्याची रबडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य. साबुदाणे, दूध, साखर, केळी, वेलची पावडर, काजू, बदाम, सफरचंद, चेरी, डाळिंब, केशर, गुलाबाच्या पाकळ्या.
साबुदाण्याची रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाटी साबुदाणे स्वच्छ धुवून घ्या आणि स्वच्छ धुतल्यानंतर एका भांड्यामध्ये थोड्याश्या पाण्यात भिजत ठेवा. साबुदाणे भिजल्यानंतर एका टोपात दूध घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवून द्या आणि दुध मंद आचेवर ठेवा ज्यामुळे त्यामदील बॅक्टिरिया निघुन जातात.
दुधाला उकळी आल्यानंतर भिजवलेला साबुदाणा दुधात टाकून मंद आचेवर गॅस ठेवा. तयार मिश्रण सतत ढवळत राहा नाहितर भांड्याच्या तळाला साबनदाणा चिकटू शकतो. साबुदाणे शिजल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
साखर वितळल्यानंतर गॅस बंद करून घ्या. दुधाचे मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर त्यात क्रीम, केळी आणि चिरलेले सफरचंदमी, केशर घालून सर्व सामग्री मिक्स करून घ्या. त्यानंतर २ ते ३ तास साबुदाण्याचे मिश्रण फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
थंड झालेले मिश्रण बाहेर काढून काचेच्या बाऊलमध्ये रबडी काढून वरून चेरी, डाळिंब, गुलाबाच्यापाकळ्या आणि बारीक चिरलेले काजू बदाम घालून सज. तयार आहे उपवास स्पेशल साबुदाण्याची रबडी.
Edit By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.