Home Loan  google
Image Story

घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! 'या' बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त Home Loan

Home Loan Interest Rate : घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेकांना होम लोनचा ऑप्शन निवडावा लागतो. अशावेळी योग्य बँक आणि कमी व्याजदर निवडल्यावर लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav
Central Bank home loan

RBI चा होम लोनधारकांना दिलासा

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्या होम लोनच्या ईएमआयमध्ये वाढ होणार नाही, अशी शक्यता आहे. महागाई आणि जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन कर्ज घेणाऱ्यांना स्थिर व्याजदराचा फायदा मिळणार आहे.

lowest home loan rate

सर्वात कमी व्याजदर कोणत्या बँकेत?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये 7.10 टक्क्यांपासून होम लोन दिलं जातं. त्यामुळे या बँका सध्या सर्वात स्वस्त पर्यायांपैकी मानल्या जातात. कर्जाच्या दाराच्या क्रेडिट स्कोअर आणि पात्रतेनुसार याच्या व्याजाचा दर ठरवला जातो. त्यामुळे अर्जाआधी सर्व अटी तपासणं महत्वाचं आहे.

lowest home loan rate

SBI आणि बँक ऑफ बडोदाचे दर

स्टेट बँक ऑफ इंडिया 7.25 ते 9.05 टक्क्यांपर्यंत व्याजदराने होम लोन देते. तर बँक ऑफ बडोदाचे दर 7.20 टक्क्यांपासून सुरू होतात. देशातील मोठ्या सरकारी बँका असल्यामुळे ग्राहकांचा या बँकांवर मोठा विश्वास आहे.

cheapest home loan

युनियन बँक आणि कॅनरा बँकेचे पर्याय

युनियन बँक ऑफ इंडिया 7.15 ते 9.60 टक्के दरम्यान होम लोन देत आहे. तर कॅनरा बँकेचे व्याजदर 7.25 ते 10 टक्क्यांपर्यंत आहेत.

home loan interest rate

इंडियन ओव्हरसीज बँकेची विशेष योजना

इंडियन ओव्हरसीज बँकेत पगारदार ग्राहकांसाठी होम लोनचा व्याजदर 7.10 टक्क्यांपासून सुरू होतो. तर स्वयंरोजगार किंवा इतर ग्राहकांसाठी हा दर 8.20 टक्क्यांपासून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT