ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी शुभ आणि राजयोग निर्माण होत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर त्याचप्रमाणे देश आणि जगावर परिणाम होत असतो. २८ मे रोजी म्हणजेच उद्या चंद्र मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. याठिकाणी गुरु आधीच उपस्थित आहे.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. त्याचबरोबर या राजयोगामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी अचानक आर्थिक लाभासोबत प्रगतीची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. या काळात तुम्ही प्रभावशाली लोकांना भेटाल. हा काळ अभ्यासात यश मिळवून देणार आहे. कोर्टाच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय मिळणार आहे.
गजकेसरी राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात नवीन प्रकल्प मिळू शकतात. लांबचे प्रवास फलदायी ठरतील. पैसे गुंतवण्याची ही योग्य वेळ आहे.
गजकेसरी राज योगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या राशीपासून तुमच्या भाग्य आणि परदेशात तयार होणार आहे. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. सामाजिक कार्यात तुमची ओळख वाढणार आहे. तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.