Kaam Trikon Yog saam tv
राशिभविष्य

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

Kaam Trikon Yog 2025: ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहांचे विशिष्ट स्थान मोठे राजयोग तयार करते. १८ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एक अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ ‘काम त्रिकोण योग’ (Work Triangle Yoga) तयार होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. या बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना विशेष ठरू शकणार आहे. याचं कारण गुरु बृहस्पति, राहु आणि मंगल एकत्र काम त्रिकोणात असतील. यामुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक धन लाभ, नोकरी, व्यापार, विवाह या घटनांमध्ये सकारात्मक बदल घडणार आहेत.

ग्रहांची स्थिती

या काळात राहु कुंभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि मंगल तूळ राशीत स्थित आहेत. तूळ राशीत मंगल अंशबलाने थोडा कमजोर होता. यावेळी मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार असन काम त्रिकोण योगाच्या प्रभावाने, जेव्हा ग्रह तिसऱ्या, सातव्या आणि एकादश भावाशी संबंधित असतो आणि त्याची महादशा, अंतर्दशा किंवा प्रत्यंतरदशा एक्टिव्ह असते. तेव्हा त्या ग्रहाशी संबंधित इच्छा पूर्ण होतात.

मकर राशि (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या जातकांसाठी या त्रिकोण योगाचा परिणाम अत्यंत शुभ ठरू शकतो. गुरुच्या प्रभावामुळे नोकरी, स्पर्धा आणि शिक्षणात यश मिळू शकणार आहे. राहुच्या द्वितीय भावाच्या स्थितीमुळे अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. अडकलेल्या कामांना पुन्हा गती येणार आहे. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

कन्या राशि (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या जातकांसाठी काम त्रिकोण योग अनेक बाबतीत लाभदायक ठरू शकणार आहे. छठा भाव नोकरी आणि सेवा क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे करिअरमध्ये प्रगती मिळेल. राहुच्या विदेशी कंपन्यांशी संबंधामुळे नवीन नोकरी किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. जीवनातील दीर्घकालीन समस्या दूर होतील आणि महत्वाची उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात. चौथ्या भावावर गुरुची दृष्टि असल्यामुळे मालमत्ता संबंधित विवाद मिटणार आहेत.

धनु राशि (Sagittarius Zodiac)

धनु राशीच्या जातकांसाठी राहु, मंगल आणि गुरुच्या त्रिकोण योगामुळे आर्थिक आणि करिअर संबंधी मोठा फायदा होऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. तसेच प्रॉपर्टीमधून आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यवसायातही फायदा मिळण्याची शक्यता आहे. राहु आणि मंगल एकत्र शुभ परिणाम देतायत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरात जोरदार पाऊस; उळे - कासेगाव पूल पुन्हा गेला पाण्याखाली

Maharashtra Rains: पावसाचा हाहाकार, ४ जिल्ह्यात शाळांना सुट्टी, मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटला, परिस्थिती पुन्हा भयानक

IRCTCचं खास पॅकेज! ७ ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार एकाच ट्रीपमध्ये! भाडं फक्त इतकंच, वाचा सविस्तर

Whatsapp New Feature: स्टेटस Privacy वाढली! व्हॉट्सअ‍ॅपवर आता तुम्हीच ठरवा कोण करू शकेल तुमचा स्टेटस री-शेअर

Shrikhand Recipe : दसऱ्याला खास करा श्रीखंड पुरीचा बेत, खाणारे बोट चाटत राहतील

SCROLL FOR NEXT