Chandra Grahan Saam Tv
राशिभविष्य

Chandra Grahan 2026: भारतात दिसणार पहिलं चंद्रग्रहण कधी? धार्मिक नियम आणि सूतक काळ जाणून घ्या

Chandra Grahan 2026 Date: संक्रांतीच्या दिवशी काळी साडी परिधान करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. काळ्या साडीला योग्य दागिने परिधान केल्यास सौंदर्य अधिक खुलते. विशेषतः मंगळसूत्र हा प्रत्येक विवाहित स्त्रीच्या अलंकारांमध्ये महत्त्वाचा मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण महत्त्वाचं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणांचा परिणाम संपूर्ण देश आणि जगावर होतो. हिंदू धर्मामध्ये ग्रहण काळ अशुभ मानला जातो. या कारणास्तव, या काळात कोणतीही प्रार्थना केली जात नाही आणि मंदिराचे दरवाजे बंद राहतात.

या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होणार आहे. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीने पूर्णपणे झाकला जाणार आहे. जगातील काही भागांमध्ये यावेळी ब्लड मून दिसून येणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार असून धार्मिक सुतक काळ देखील असणार आहे. चंद्र ग्रहणाच्य वेळी असलेला सूतक काळ आणि ग्रहणाची इतर माहिती जाणून घेऊया.

कधी लागणार पहिलं चंद्रग्रहण?

२०२६ या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मंगळवार, ३ मार्च रोजी दुपारी २:१६ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ६:२४ वाजता संपणार आहे.

  • चंद्रोदय – सायं. 06:26

  • उपच्छायेत पहिला स्पर्श – दुपारी 02:16

  • प्रच्छायेत पहिला स्पर्श – दुपारी 03:21

  • खग्रास प्रारंभ – सायं. 04:35

  • परमग्रास चंद्रग्रहण – सायं. 05:04

  • खग्रास समाप्त – सायं. 05:33

  • प्रच्छायेत अंतिम स्पर्श – सायं. 06:46

  • उपच्छायेत अंतिम स्पर्श – सायं. 07:52

ग्रहणाचा कालावधी

  • खग्रासाची अवधि – 00 तास 57 मिनिटे 27 सेकंद

  • खंडग्रासाची अवधि – 03 तास 25 मिनिटे 17 सेकंद

  • उपच्छायेत अवधि – 05 तास 35 मिनिटे 45 सेकंद

भारतात दिसणार का चंद्रग्रहण?

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. ते पूर्व भारतात म्हणजेच अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोरममध्ये सर्वात जास्त दिसणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील भागांव्यतिरिक्त, कोलकाता, गुवाहाटी, इटानगर आणि ऐझॉल सारख्या शहरांमध्येही हे दिसेल. या शहरांव्यतिरिक्त, ते दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, लखनऊ आणि जयपूर सारख्या शहरांमध्ये अंशतः दिसणार आहे.

चंद्रग्रहणाचा या राशींवर होणार नकारात्मक परिणाम

वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणादरम्यान चंद्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आणि सिंह राशीत असेल हे लक्षात घेतलं पाहिजे. ही युती सिंह राशीत केतूसोबत होणार आहे. परिणामी १२ राशींपैकी काहींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. मेष, कर्क आणि सिंह राशीच्या राशींना चंद्रग्रहणादरम्यान विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

चंद्रग्रहणाचा सूतक काळ

हिंदू धर्मात सुतक काळाचं विशेष महत्त्व आहे. जो ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होणार आहे. या काळात कोणतंही शुभ किंवा शुभ कार्य करण्यास मनाई असते. त्याचप्रमाणे मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. सुतक काळ चंद्रग्रहणाच्या अंदाजे नऊ तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतर संपतो. सुतक काळ ३ मार्च रोजी सकाळी ९:३९ वाजता सुरू होणार आहे आणि ग्रहण संपल्यानंतर संपणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

अजितदादांच्या जाहीरनाम्यात मेट्रो प्रवास मोफत, फडणवीसांनी उडवली दादांची खिल्ली

रवींद्र चव्हाण पडले मौलवींचे पाया? मौलवी भाजपच्या सभेत?

SCROLL FOR NEXT