Lucky Moles saam tv
राशिभविष्य

Lucky Moles: तुम्ही नशीबवान आहात का? महिलांसाठी शरीराच्या 'या' 6 जागांवर असलेला तीळ असतो लकी

महिलांच्या शरीरावरील तिळ असेल तर सामुद्रिक शास्त्रानुसार काय अर्थ असतात ते जाणून घ्या. कोणते तिळ शुभ मानले जातात आणि ते नशीब, व्यक्तिमत्त्व आणि आर्थिक स्थितीवर कसा प्रभाव टाकतात ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

शरीरावरील तीळ हे केवळ सौंदर्याचे चिन्ह मानलं जात नाहीत तर सामुद्रिक शास्त्रानुसार ते व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, नशीब आणि स्वभाव यांची माहिती आपल्याला देत असतात. शरीरावर असलेल्या तीळाचा अर्थ काय असतो हे तुम्हाला माहितीये का? महिलांच्या बाबतीत शरीराच्या काही भागावर असलेले तिळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सासरच्या घरासाठीही शुभ मानले जातात.

महिलांच्या शरीरावर असलेल्या तीळाचा अर्थ काय असतो ते पाहूयात.

माथ्याच्या मध्यभागी तिळ

माथ्याच्या अगदी मध्यभागी तिळ असणं हे लकी चिन्ह मानलं जातं. अशा महिला आत्मविश्वासू असतात आणि त्या आपल्या कुटुंबासाठी यशाचे नवीन मार्ग तयार करतात. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे घरात प्रगतीची वाट मोकळी होते.

हाताच्या तळव्यावर तिळ

जर एखाद्या महिलेच्या तळव्याच्या मध्यभागी तिळ असेल आणि मूठ बंद केल्यावर तो दिसत नसेल तर हे खूप शुभ मानलं जातं. अशा महिलांच्या आयुष्यात पैशांची कमतरता सहसा भासत नाही. त्यांच्या हातात पैसा टिकतो.

पायाच्या तळव्यावर तिळ

पायाच्या तळव्यावर तिळ असणं म्हणजे राजयोगाचं चिन्ह मानलं जातं. अशा महिला करिअरमध्ये मोठं यश मिळवतात. त्यांना परदेश प्रवासाच्या संधीही मिळतात.

हनुवटीवर तिळ

हनुवटीर तिळ असणं हे फक्त सौंदर्य वाढवणारं नसून आर्थिक स्थैर्याचंही प्रतीक मानलं जातं. अशा महिला स्वभावाने शांत असतात आणि पैशांचं योग्य नियोजन करण्यात कुशल असतात. त्यांच्या घरात नेहमी सुख-समृद्धी टिकून राहते.

नाकाच्या टोकावर तिळ

नाकाच्या टोकावर तिळ असणं अत्यंत शुभ समजलं जातं. हे राजयोगाचं लक्षण मानलं जातं. अशा महिलांना कमी मेहनतीतही चांगलं यश मिळतं. त्या ज्या घरी जातील त्या घरा समृद्धी येते.

कंबरेवर तिळ

कंबरेवर तिळ असणं देखील शुभ मानलं जातं. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा महिलांना आयुष्यात भौतिक सुख-सुविधा मोठ्या प्रमाणात मिळतात. त्या आपल्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होतील, खर्चाचं टेन्शन वाढेल; ५ राशींच्या लोकांची धनाने झोळी भरणार

KKR चा सलग चौथा विजय; दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर चारली धूळ

नवी मुंबई-कल्याणकरांचा प्रवास होणार जलद; ऐरोली-कटाई नाका कॉरिडोरचा दुसरा टप्पा पूर्ण, मार्ग कधी सुरू होणार?

कोकणच्या समुद्रातून पाणी होतंय गायब? हजार फुटांची ओहोटी, त्सुनामीची नांदी?

कोरोनापेक्षा भयंकर हंटा व्हायरस, हंटानं घेतला 3 नागरिकांचा बळी, (WHO) जागतिक आरोग्य संघटनेचा 12 देशांना अलर्ट

SCROLL FOR NEXT