Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2025: धनदाता शुक्राचा मंगळाच्या राशीमध्ये प्रवेश; 'या' राशींना मिळणार लाभ, हाती येणार पैसाच-पैसा

वैदिक ज्योतिषानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतात. धन, वैभव, प्रेम, सौंदर्य, सुख आणि ऐश्वर्य देणारा शुक्र सध्या मीन राशीमध्ये वास्तव्य करत आहे. तो ३१ मेपर्यंत या राशीत थांबणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. संपत्ती, समृद्धी, प्रेम, आकर्षण, भोग आणि विलासिता देणारा शुक्र सध्या मीन राशीत आहे. यावेळी ३१ मे पर्यंत या राशीत राहणार आहे. यानंतर, तो आपली राशी बदलून मंगळ, मेष राशीत प्रवेश करणार आहे.

शुक्र मेष राशीत प्रवेश करत असल्याने यावेळी काही राशींना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकणार आहे. तसंच तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही मिळू शकणार आहे. यातूनच जीवनात आनंद येऊ शकणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना खास लाभ मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

मेष रास

शुक्र राशीचा बदल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप प्रगती मिळू शकणार आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर ते तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे.

मिथुन रास

या राशीत, शुक्र पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि तो अकराव्या घरात भ्रमण करणार आहे. यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. आयात-निर्यात व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकणार आहे. तुमच्या अनेक भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतात. अविवाहित लोकांच्या आयुष्यात काही खास व्यक्तीचा प्रवेश होऊ शकणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह खूप शुभ ठरू शकणार आहे. तुम्ही कोणत्याही कामात करत असलेली मेहनत यश मिळवून देणार आहे. माध्यम, कला इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना खूप फायदे मिळू शकतात. व्यवसायातून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा मिळू शकणार आहे. कुटुंबाशी तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT