Vrishchik Rashi Career
Vrishchik Rashi Career Saam TV
राशिभविष्य

Vrishchik Rashi Career: वृश्चिक राशीचे लोक असतात खूपच हट्टी, फक्त त्यांना नडतात 'या' गोष्टी; जाणून घ्या राशीबद्दल...

Anjali Potdar

मंगळ या ग्रहाची जलतत्त्वाची असणारी आपली रास. विशाखा नक्षत्राचा एक चरण अनुराधा चार आणि ज्येष्ठा चार असेच मिळून वृश्चिक रास तयार होते. खरेतर स्थिररास आहे मनाला जे येईल त्या गोष्टी आणि त्याच्यावर तुम्ही ठाम असता. एकदा एखादी गोष्ट ठरवली की काळ्या दगडावरची रेघ असते. स्थिरत्व हे आपले गुण आहेत. काही वेळेला या राशीला वाईट म्हटले आहे. पण खरंतर ही रास्त्री राशी आहे.

जलतत्त्वाची राशी सुद्धा आहे. पण मंगळाचे गुण मिळाल्यामुळे कपटीपणा, खुनशीपणा, व्यसन वासानेचा अतिरेक या गोष्टी तुमच्यामध्ये आढळतात. काही गोष्टी मनातच ठेवून अबोला धरणे हा आपल्या राशीचा दुर्गुण आहे म्हणता येईल. मेष राशीसारखी मोकळी असणारी आपले रास नाही. वृश्चिक राशी मध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक आहे.

आजार असणे त्याच्याशी सहनशीलता सोशिकता या गोष्टी तुमच्याकडे अधिक आहेत. काही गोष्टी या संथ, रटाळ, दीर्घकालीन आपल्या असू शकतात. सहजगत्या प्रगतीचे योग नाहीत. तुम्हाला कायमच परिस्थितीशी दोन हात करायला लागतात. वृश्चिक रास ताकत देते. वाईट परिस्थिती आली तर मोडतोड होत नाही. आपले खांब हे बळकट करत असतात. या राशीमधून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या सुद्धा आहेत.

दहा लोकांची काम एकच व्यक्ती करण्याची जी ताकद आहे ही वृश्चिक राशीमध्ये आहे. खरंतर पुरुषी असणारी आपली रास आहे. कीटक रास आहे. अंधाराची विशेष ओढ असते. राशीच्या आजारांचा विचार केला तर आपल्याला गुहेंद्रिय निगडित, गुप्तेंद्रिय निगडित आजार होऊ शकतात. रक्ताचे आजार. ज्या आजारांचे निदान लागत नाहीत, अशा गोष्टी आपल्याला होऊ शकतात. आपल्या विचारांमुळे होणाऱ्या शारीरिक तक्रारी या गोष्टी आहेत.

शरीरामधील रसायनांवर या राशीचा अंमल आहे. त्यामुळे त्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी असणाऱ्या गोष्टी या राशीवर येतात. हार्मोनल ग्रंथी याच्यावर या राशीचा अंमल आहे. किडनी स्टोन, मुळव्याध, फिशर आतड्यांचे रोग यांना होऊ शकतात .व्यवसायामध्ये या राशीचा विचार केला तर मोठया हुद्द्याचे व्यवसाय यांना सहजगत्या मिळतात.

कामाची ताकद आणि कपॅसिटी असल्यामुळे अधिकार पदावर जाणारे हे लोक आहेत. सर्जरी, केमिस्ट,फार्मा, स्मगलिंग, काळेधंदे, गुप्तहेर, पोलीस, द्रव पदार्थांशी निगडित व्यवसाय, निरीक्षक, अधिकार पदावरच्या गोष्टी आपल्या राशीमध्ये आहेत. शवागर कामगार, खाटीक वर्ग इत्यादी. राशीचे फळ चांगले मिळण्यासाठी कुलदेवतेची उपासना करणे हे आपल्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

S Somnath: '...तर विध्वंस नक्की', पृथ्वीला धडकणार एस्टेरॉयड; इस्रो प्रमुखांनी दिला इशारा

Team India's Victory Parade Live: वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांचा जल्लोष, थोड्याच वेळात टीम इंडिया येणार मैदानात

Hathras Stampede : स्वयंघोषित भोले बाबाचा दावा, मृत मुलगीला केलं जिवंत? काय खरं काय खोटं? बाबाला का झाली अटक?

Pimpri Chinchwad : महापालिकेच्या रुग्णालयात जमा झालेल्या रोख रकमेत घोटाळा; अधिकाऱ्यांकडून रक्कम गायब केल्याचा आरोप

Kalyan Crime : इथं टेम्पो का उभा केला, म्हणत तरुणाला दिला चोप; भाजपच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप

SCROLL FOR NEXT