Rashi Bhavishya Today 10th June 2024 Saam Tv
राशिभविष्य

Horoscope Today : आज विनायक चतुर्थी, बाप्पाच्या आशीर्वादाने कसा जाईल तुमचा दिवस? वाचा आजचं राशी भविष्य

Rashi Bhavishya Vinayak Chaturthi : आज विनायक चतुर्थी असून गणपती बाप्पाची कोणकोणत्या राशीच्या लोकांवर कृपा राहील? वाचा आजचे संपूर्ण राशी भविष्य...

Anjali Potdar

आजचे पंचांग १० जून २०२४

वार - सोमवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी. नक्षत्र - पुष्य. योग ध्रुव. करण - विष्टी. रास - कर्क. विनायक चतुर्थी. दिनविशेष - १६ नंतर चांगला.

मेष : नवीन घराचे स्वप्न बघाल

"असावे घरकुल आपले छान" अशी भावना आज होईल. नवीन घर बांधणे किंवा घराचं रिनोवेशन याची स्वप्ने बघाल . त्या दृष्टीने प्रयत्न कराल. आईशी संबंध आज "तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना" असे राहणार आहेत.

वृषभ : नित्यनेमाने काम करा

"चलता चल तू साथी चलता चल" असा दिवस आहे. नित्यनेमाने कामाला लागले तर यश नक्कीच मिळते. आज असाच पराक्रमाचा दिवस आपल्या वाटेला आलेला आहे. त्यामुळे सकारात्मक रहा.

मिथुन : पैशाची आवक चांगली राहील

जिभेचे चोचले आज पुरवावे लागतील. वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आज मोह होईल. घरातल्यांबरोबर याचा आस्वाद लुटाल. पैशाची आवक जावक चांगली राहील.

कर्क : छोट्या मोठ्या गोष्टींचाकडे दुर्लक्ष करा

स्वतःवरच विशेष खुश व्हाल. जीवनाचा निखळ आनंद आज लुटाल. इतरांच्या छोट्या मोठ्या गोष्टींचाकडे दुर्लक्ष करा आणि सुखाच्या पर्वणीचे स्वागत करा.

सिंह : इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा

आपल्याला एक तर कोणी बोललेले चालत नाही अपमान पचत नाहीत आणि आज कदाचित त्याचाच दिवस आहे. मनस्थिती बिघडेल. या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर दुर्लक्ष करा.

कन्या : लाभ पदरात देणारा दिवस

"ये दोस्ती हम नही छोडेंगे" असा आजचा दिवस आहे. मित्र-मैत्रिणींसाठी घट्ट बंध राहतील. नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी मिळून मिसळून वागाल. एकूणच दिवस आपल्याला लाभ पदरात देणारा आहे.

तुळ : नवीन कामे मिळतील

आपली चर रास आहे. फिरणे, भ्रमंती या गोष्टी आपल्याला आवडतात. अर्थात काम आणि प्रवास या दोन्ही गोष्टींचा मेळ आज साधून येईल. या कामामधून पुढील अजून नवीन कामे मिळतील. संधीचे सोने करा.

वृश्चिक : गणपतीची उपासना फलदायी ठरेल

"सखा माझा पांडुरंग" असा काहीसा आजचा दिवस आहे. म्हणजे काय तर देवधर्म आणि उपासना याच्याकडे कल राहील. आज विनायक चतुर्थी आहे. विशेषत्वाने गणपतीची उपासना फलदायी ठरेल.

धनु : आज शारीरिक श्रम होतील

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" असा कष्टाचा आजचा दिवस आहे. इतरांना जर आपण चांगल्या गोष्टी किंवा ध्येयाकडे नेणार असाल तर त्याचे कष्ट तुम्हाला उपसावे लागतील. एकूण शारीरिक श्रम आज अधिक होतील.

मकर : काम मनासारखे होईल

"माझ्या प्रीतीच्या फुला" असा आजचा दिवस आहे. काम मनासारखे होईल. सर्व गोष्टी नेटाने पुढे न्याल. कोर्टकचेरीच्या कामांपासून विशेष लाभ.

कुंभ : काहीतरी नवीन खटपटी कराल

काहीतरी नवीन संशोधन खटपटी करण्यासाठी आजचा दिवस आहे. आपली बौद्धिक क्षमता पणाला लागेल. मामाच्या घरी आजोळी सुसंवाद साधाल.

मीन : गणपतीची बाप्पाची उपासना करा

गणेश उपासना करा. ओम गं गणपतये नमः जप करा. उपासनासाठी आजचा दिवस फलाच्या दृष्टीने सुवर्णकमान घेऊन आलेला आहे. म्हणून मन स्वस्थ ठेवून ध्यानावर लक्ष केंद्रित करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT