Shukra Gochar saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Venus enters Saturn house money: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांचे राशी परिवर्तन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम करतात. येत्या नवीन वर्षात शुक्र देखील त्याच्या राशीत बदल करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्याचप्रमाणे शुक्र देखील दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतात. यावेळी जानेवारी महिन्यात धन दाता शुक्र मकर राशीत गोचर करणार आहेत. मकर राशीचे स्वामी शनी असून शनी आणि शुक्र याच्यामध्ये मित्रत्वाची भावना आहे.

यावेळी ३ अशा राशी आहेत ज्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या या गोचरमुळे या ३ राशींचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांना आर्थिक लाभासोबत अनेक चांगल्या संधी चालून येणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

वृषभ रास (Vrishabh Rashi)

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर अधिक लाभदायक ठरणार आहे. यावेळी तुमची थांबलेली कामं पुन्हा सुरु होणार आहेत. या काळात तुम्ही नवी संपत्ती खरेदी करू शकता. तुमच्या करियरमध्ये तुम्ही मोठ उंची गाठू शकणार आहात. अज्ञात स्त्रोताकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

तूळ रास (Tula Rashi)

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्राचं गोचर सुख आणणार आहे. ज्यामध्ये तुमच्या सुख-सुविधांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. रियल एस्टेट, प्रॉपर्टी यांच्यासारखे बिझनेस असणाऱ्या व्यक्तींना चांगला नफा मिळू शकणार आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत जर तुमचं रिलेशन बिघडलं असेल तर ती नाती सुधारणार आहेत.

मेष रास (Aries Zodiac)

या राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन चांगलं राहणार आहे. यावेळी तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला चांगला पैसा मिळणार हे. करियरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये वाढ होणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्वांची मदत होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belapur Tourism : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Monsoon Yoga: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग रोज करा 'ही' सोपी योगासने

Alpha Box Office Collection : 'अल्फा'नं पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी, आलिया-शर्वरीच्या ॲक्शन अन् ग्लॅमरची जादू फेल? वाचा कलेक्शन

School Closed: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई ठाण्यासह 'या' ठिकाणी आज शाळांना सुट्टी, प्रशासनाचे आदेश

SCROLL FOR NEXT