Shukra Nakshatra Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Shukra Nakshatra Gochar: शुक्रदेव 'या' राशींना करणार मालामाल, नक्षत्र परिवर्तनाने घरी पडणार पैशांचा पाऊस

Shukra Nakshatra Gochar 2024: शनि देखील एका विशिष्ट कालावधीनंतर नक्षत्र बदलतो. याचा परिणाम 12 राशींच्या जीवनावरही कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी धन आणि समृद्धी देणाऱ्या शुक्राच्या स्थितीत होणाऱ्या बदलाचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होतो. शनि देखील एका विशिष्ट कालावधीनंतर नक्षत्र बदलतो. याचा परिणाम 12 राशींच्या जीवनावरही कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो.

11 डिसेंबरला शुक्र नक्षत्र बदलून श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. पंचांगानुसार, शुक्र 11 डिसेंबर रोजी पहाटे 3.27 वाजता श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी हे 22 वे नक्षत्र आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

या राशीत शुक्र चढत्या घरात असणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. भौतिक सुख मिळू शकणार आहे. काही नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यताही खूप आहे. व्यवसायात तुम्ही केलेली योजना फायदेशीर ठरू शकणार आहे. अविवाहितांना लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे.

धनु रास

या राशीत शुक्र दुसऱ्या घरात असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकणार आहात. या राशीचे लोक लवकर नवीन नोकरी शोधू शकतात. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे.

वृषभ रास

शुक्र श्रवण नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. तुमचा अध्यात्माकडे जास्त कल असणार आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तुम्हाला चांगली संधी मिळणार असून तुम्ही त्याचं सोनं करू शकणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT