Shukra Shani Gochar  Saam Tv
राशिभविष्य

Shani-Shukra Yuti: नववर्षात शुक्र-शनीच्या युतीने 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप; आरोग्य सांभाळा, पैशांची कमतरता भासेल

Shani-Shukra Yuti 2025: पुन्हा एकदा शुक्र ग्रह गोचर करणार असून यावेळी तो शनि ग्रहासोबत संयोग घडवणार आहे. या दोघांच्या संयोगाने काही राशींच्या जीवनात उलथापालथ होऊ शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्र आणि वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. दर 26 दिवसांनी शुक्र त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी त्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. ज्याचा काही राशींवर चांगला प्रभाव पडतो तर काहींवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

पुन्हा एकदा शुक्र ग्रह गोचर करणार असून यावेळी तो शनि ग्रहासोबत संयोग घडवणार आहे. या दोघांच्या संयोगाने काही राशींच्या जीवनात उलथापालथ होऊ शकणार आहे. जाणून घेऊया शनी आणि शुक्राची युती केव्हा होणार आहे. यावेळी कोणत्या राशीच्या लोकांना या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे आयुष्यात अडचणी येणार आहेत, ते पाहूयात.

धनु रास

शनी आणि शुक्रच्या युतीचा धनु राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. या राशीच्या लोकांना खूप सावध राहावं लागणार आहे. अनावश्यक खर्च, कर्ज, कुटुंब आणि मित्रांमधील मतभेद, वाद अशा अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

मीन रास

मीन राशीच्या बाराव्या घरात शनी आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या राशीच्या लोकांसाठीही काही समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात मीन राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकणार आहे. या काळात अपघात होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये नुकसान सहन करावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद घालू नका.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा योगही चांगला राहणार नाही. या राशीच्या सहाव्या घरात हा संयोग तयार होणार आहे. घरातील व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार नाहीत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT