वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एकाच राशीत ग्रहांची युती निर्माण होते. पुढच्या महिन्यात अशीच दोन ग्रहांची युती होणार आहे. धन आणि समृद्धी देणारा शुक्र डिसेंबर महिन्यात दोनदा राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र सुमारे 26 दिवसात आपली राशी बदलतो, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होतो.
डिसेंबर महिन्यात शुक्र 28 तारखेला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी शनी ग्रह आधीच या राशीत असल्याने राक्षसांचा गुरू शुक्र आणि कर्म देणारा शनि यांचा संयोग होणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या संयोगाचा चांगलात फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
या राशीमध्ये शनी आणि शुक्र आठव्या भावात स्थित असल्याने यावेळी तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होणार आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना बरेच फायदे मिळणार आहेत. पदोन्नतीसोबत पगार वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढू शकणार आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे.
या राशीच्या चढत्या घरात दोन्ही ग्रहांचा संयोग होणार आहे. प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. गाडी खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रत्येक कामात यश मिळवणं शक्य आहे.
या राशीमध्ये शुक्र आणि शनीचा संयोग नवव्या भावात होणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेला गोंधळ काही प्रमाणात कमी होऊ शकणार आहे. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह धार्मिक स्थळांना द्या. उच्च शिक्षणाची संधी तुम्हाला मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)