Vastu Tips House Temple google
राशिभविष्य

Vastu Tips House Temple: चुकूनही तुमच्या देव्हाऱ्यात 'या' ३ मूर्ती ठेऊ नका; आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता

Vastu Tips House Temple: जर वास्तूनुसार बांधलं नाही तर जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्याचप्रमाणे वास्तू शास्त्रामध्येही घरात असलेल्या देवाऱ्यासंदर्भात अनेक नियम देण्यात आले आहेत. यावेळी वास्तूमध्ये देव्हाऱ्याबाबत विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतो. हिंदू धर्मातील लोकांच्या देव्हाऱ्यात केवळ एका देवाची मूर्ती नसते. वास्तू शास्त्रानुसार, आपले घर बांधलं तर जीवनात सुख-समृद्धी येते असं मानलं जातं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर वास्तूनुसार बांधलं नाही तर जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

त्याचप्रमाणे वास्तू शास्त्रामध्येही घरात असलेल्या देव्हाऱ्यासंदर्भात अनेक नियम देण्यात आले आहेत. यावेळी वास्तूमध्ये देव्हाऱ्याबाबत विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये म्हणजे घरातील देव्हारा कोणत्या दिशेला असावा. तसंत पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असावं. याशिवाय घरातील मंदिरामध्ये कोणती मूर्ती ठेवावी आणि कोणती ठेवू नये, याचीही माहिती या ठिकाणी देण्यात आलीये. जाणून घेऊया घराच्या देव्हाऱ्यात कोणत्या प्रकारच्या मूर्ती ठेऊ नयेत.

मृत नातेवाईकांचे फोटो

वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या मृत नातेवाइकांचे फोटो देवाऱ्यात किंवा देव्हारा असलेल्या खोलीत ठेऊ नयेत. इतकंच नाही तर तुमच्या घरी असलेल्या असा फोटोंची रोज पूजा करू नये. पितृपक्षातच मृत नातेवाईकांची पूजा करावी.

या देवींची मूर्ती ठेऊ नये

काली माँ, राहू-केतू, शनिदेव यांची मूर्ती देखील घरच्या देव्हाऱ्यात ठेवू नये. शास्त्रानुसार, या सर्व मूर्ती उग्र मानल्या जातात. या देवींच्या पूजेची विधी खूप कठीण असते. जे सामान्य माणूस करू शकत नाही.

नृत्य करणाऱ्या गणपतीची मूर्ती

वास्तू शास्त्राप्रमाणे, देव्हाऱ्यात गणपतीची प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती तसंच नृत्य करणाऱ्या गणपतीची मूर्ती ठेऊ नये. देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती नेहमी विराजमान असावी. अशा गणपतीचे आशीर्वाद नेहमी चांगले मानले जातात.

मां लक्ष्मीची मूर्ती जरूर ठेवावी

घरातील देव्हाऱ्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती अवश्य ठेवावी. कारण माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं. त्यामुळे ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते, त्या ठिकाणी धन-समृद्धी वास करते, असं मानलं जातं. त्याचप्रमाणे लक्ष्मीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत असावी.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT