Rajyog saam tv
राशिभविष्य

Mangal Guru Yog: ऑक्टोबर महिन्यात बनणार 2 राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Financial growth October: या महिन्यात ग्रहांचे सेनापती मंगळ (Mars) आणि नवग्रहांचे गुरु बृहस्पति (Jupiter) हे दोन्ही ग्रह एकाच वेळी दोन अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली 'महापुरुष राजयोग' (Mahapurush Rajyoga) निर्माण करणार आहेत

Surabhi Jayashree Jagdish

ऑक्टोबर महिना धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याचं कारण म्हणजे या महिन्यात मोठे सण-उत्सव साजरे होणारच आहेत. मात्र त्याचसोबत ग्रह-नक्षत्रांची स्थिती देखील विशेष बदल घडवून आणणार आहे. ज्योतिषांच्या मते, या काळात गुरू आणि मंगळ एकत्र येऊन काही शुभ योगांची निर्मिती करणार आहेत.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, या महिन्यात गुरू ग्रह उच्च राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे ‘हंस महापुरुष राजयोग’ तयार होणार आहे. दरम्यान त्याचवेळी मंगळ ग्रह स्वतःच्या स्वराशीत म्हणजे वृश्चिक राशीत प्रवेश करून ‘रुचक राजयोग’ तयार करणार आहेत.

एका महिन्यात हे दोन्ही दुर्मिळ आणि शक्तिशाली राजयोग तयार होणं हे अत्यंत शुभ मानण्यात येतंय. या योगांचा प्रभाव काही राशींवर विशेषतः सकारात्मक राहणार असल्याचं ज्योतिष सांगणार आहेत.

मेष रास

या महिन्यात मेष राशीच्या जातकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. आधीपासून अडकलेली कामं वेगाने पूर्ण होणार आहेत. करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात नवी यशस्वी संधी उपलब्ध होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि समाजात मान–सन्मान वाढणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी हा काळ शुभ घडामोडी घेऊन येणार आहे. नवीन योजनांची सुरुवात करण्यासाठी हा योग्य काळ आहे. नोकरीत पदोन्नती किंवा बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल.

कर्क राशी

गुरू ग्रहांचा उच्च राशीत प्रवेश कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचे भाग्य अधिक मजबूत होईल. करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. निर्णय घेताना आत्मविश्वासाने पुढे गेल्यास प्रगतीचे दरवाजे उघडतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT