Vastu Shastra Social Media
राशिभविष्य

Vastu Shastra: तुळस दारासमोर ठेवताय? मग जाणून घ्या वास्तूचे 'हे' नियम, व्हाल धनवान

Vastu Tips: प्रत्येक गृहीणी सकाळी तुळशीची पुजा करते. हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला प्रचंड महत्व असते. घरात लक्ष्मीचा सहवास असावा यासाठी तुळशी झाड असणे महत्वाचे असते.

Saam Tv

हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला प्रचंड महत्व असते. घरात लक्ष्मीचा सहवास असावा यासाठी तुळशी झाड असणे महत्वाचे असते. प्रत्येक गृहीणी सकाळी तुळशीची पुजा करते. मात्र तुळस ठेवण्यासाठी योग्य जागा असणे सुद्धा महत्वाचे असते. बऱ्याच घरात तुळस ही दारासमोर लावली जाते. ही जागा योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यासावर आपण आज वास्तू शास्त्राचे उपाय जाणून घेणार आहोत.

तुळशीचे झाड घराच्या मुख्य दाराजवळ लावू शकतो का?

वास्तुशास्त्रानुसार, घराचे मुख्य द्वार ही अशी एक जागा आहे की, जिथे सुख समृद्धी व देवी- देवतांचे आगमन होते. यामुळे तुम्ही घराच्या मुख्य दाराजवळ अशा गोष्टी ठेवल्या पाहिजेत की ज्याने सकारात्मक वातावरण घरात राहिल. हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते. तुळशीला लक्ष्मीचे रुप मानले जाते. हे झाड लावल्याने घरात कोणताच वाईट प्रसंग येत नाही, धनधान्यांची कमी होत नाही, तसेच घरात भांडण तंटा होत नाही.

तुळशीशी संबंधित वास्तू उपाय

मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप देखील लावता येते. पण जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हवा, सुर्यप्रकाश आणि पाणी नसेल तर तुळशीचे रोप देखील सुकू शकते. म्हणून, अशा घरांमध्ये बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप लावावे. वास्तुशास्त्रानुसार तुळस घराच्या अंगणात सुद्धा लावू शकतो.

देवी लक्ष्मी प्रसन्न

घरात तुळशीचे रोप असल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. तुळशीचे रोप घरात सौभाग्य वाढवते, म्हणूनच त्याला श्री तुळशी सुद्धा म्हणतात. जर मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप असेल तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

तुळशीचे झाड कोणत्या दिशेला लावावे?

वास्तुशास्त्रानुसार, तुळस ही बाल्कनीच्या उत्तर किंवा पुर्वेला लावावी. उत्तर दिशा ही भगवान कुबेराचे स्थान मानली जाते. असे मानले जाते की, या दिशेला तुळशीचे रोप असेल तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

Sangola Bandh : भाजपच्या रॅलीत आमदाराच्या घरावर हल्ला, सोलापूरचे राजकारण तापलं, सांगोला बंदची हाक

Babasaheb Patil: 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला'; सहकार मंत्र्यांनी जखमेवर मीठ चोळलं

Third and Fourth Mumbai : तिसरी आणि चौथी मुंबई नेमकी कोणती आणि कशी, कुठपर्यंत असणार?

Jayant Patil vs Padalkar: गोपीचंद पडळकरांना मारणार; जयंत पाटलांची हाणामारीची भाषा

SCROLL FOR NEXT