Shukra Gochar 2024 negative effects saam tv
राशिभविष्य

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Shukra Gochar 2024: 29 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजेच शुक्रवारी दुपारी 3:37 वाजता शुक्र पूर्वाषाद नक्षत्रातून बाहेर पडून उत्तराषाद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मात्र शुक्राचं हे नक्षत्र गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. तर काही ग्रह राशीप्रमाणे नक्षत्र देखील बदलतात. येत्या काळात शुक्र ग्रह नक्षत्र गोचर करणार आहे. यावेळी याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

29 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजेच शुक्रवारी दुपारी 3:37 वाजता शुक्र पूर्वाषाद नक्षत्रातून बाहेर पडून उत्तराषाद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. उत्तराषाद नक्षत्राचा स्वामी सूर्य देव असून तो ग्रहांचा राजा मानला जातो. मात्र शुक्राचं हे नक्षत्र गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ ठरणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मिथुन रास

आजपासून येत्या १५ दिवसांत मिथुन राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा धोका आहे. आर्थिक नुकसानीमुळे व्यापारी चिंतेत राहणार आहे. कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. या काळात कर्ज घेऊ नये.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं नक्षत्र गोचर फारसं चांगला नसणारे. काम करणाऱ्या लोकांचे त्यांच्या वरिष्ठांशी भांडण होऊ शकतं. विवाहित लोकांचे जोडीदार आणि सासरच्यांशी भांडण होऊ शकतं. आरोग्याच्या समस्या पुन्हा एकदा त्रास देऊ शकतात.

वृश्चिक रास

वयोवृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही. मालमत्तेशी संबंधित वादात दुकानदार अडकू शकतात. एकाच कंपनीत दीर्घकाळ काम करणाऱ्या लोकांचा इतरांशी वाद होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT