Today's Rashi Bhavishya 8th June 2024, Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशी भविष्य, या राशींच्या लोकांना सापडणार प्रगतीचे नवे मार्ग; फक्त काळजीपूर्वक पाऊले टाका

Horoscope Today Marathi : आजचे राशी भविष्य, ८ जून २०२४, शनिवारी राशींच्या लोकांना सापडणार प्रगतीचे नवे मार्ग; फक्त काळजीपूर्वक पाऊले टाका

Anjali Potdar

आजचे पंचांग ८ जून २०२४

वार - शनिवार. तिथी - ज्येष्ठ शुक्ल द्वितीया. नक्षत्र - आर्द्रा. योग - गंड. करण - कौलव. रास - मिथुन. दिनविशेष - चांगला दिवस.

मेष - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवीन दिशा, नवीन मार्ग सापडतील. त्यातून आनंद आणि उत्साह याला उधाण येईल. नेहमीप्रमाणे उतावीळपणा करू नका.

वृषभ - आजच्या दिवसांमध्ये जिद्द आणि चिकाटी ठेवा. परिस्थितीच्या विरुद्ध वाटचाल करायची आहे आणि म्हणून काळजीपूर्वक पावले टाका. मनस्वास्थ्य जपा.

मिथुन - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. कोणाचेही सहकार्याची अपेक्षा न करता सकारात्मक राहा.

कर्क - पैशाची निगडित व्यवहार होतील. जुनी येणी असतील तर ती वसूल होतील. आवक वाढेल पण त्याचा संचय सुद्धा करा.

सिंह - दैनंदिन कामे मार्गी लागतील. धाडसाने आणि हिरीरीने कामात सहभाग घ्याल. भावंडांचे विशेष सहकार्य मिळेल. शेजारी सख्य राहील.

कन्या - प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव येतील. राहत्या जागेचे प्रश्न उभे राहतील. घरातील दूध दुभते जनावरे यांना सांभाळा. शेतीसाठी दिवस कष्टाचा.

तूळ - कला क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. कला, मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रगतीचा दिवस आहे.

वृश्चिक - कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा नाहक त्रास होऊ शकतो. एकूणच खर्च, आजार, कटकटी, कष्ट यांचा आलेख आज उंचावणार आहे.

धनु - आरोग्य चांगले राहील. व्यावसायिक जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन व्यवसायाचे प्रस्ताव येतील. त्यातून पुढे फायदा होईल कामासाठी प्रवास घडतील.

मकर - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. वादविवाद टाळा. आपल्यावर वाईट नजर ठेवून असणारे लोक यांच्याकडून त्रास होईल. विनाकारण नदी लागू नका. विनाकारण मनस्ताप होईल.

कुंभ - अध्यात्मिक प्रगती होईल. जिद्द चिकाटी घेऊन पुढे चला. धर्माचा झेंडा रोवाल.

मीन - व्यवसाय बाबत सकारात्मक रहाल. "कीर्ती हाताची प्रसिद्धी पायाशी" अशा गोष्टी घडतील. आज अचानक कसे सगळे मनासारखे घडून येत आहे हे बघून आपले मनही संभ्रमित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

Satara Tourism: आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव हवा असेल तर साताऱ्यातील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT