Today's Rashi Bhavishya 3rd June 2024, Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : मिथुनसह या राशींसाठी सोमवार ठरेल फायद्याचा; कामात मिळणार मोठं यश, वाचा आजचं राशी भविष्य

Horoscope Today Marathi : मिथुसह काही राशींच्या लोकांसाठी सोमवार फायद्याचा ठरणार आहे. अनेक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग सोमवार ३ जून २०२४

वैशाख कृष्ण द्वादशी. अश्विनी नक्षत्र. योग - सौभाग्य. करण - कौलव. रास - मेष. भागवत एकादशी. दिनविशेष - शुभ दिवस.

मेष : सकारात्मक राहा

"पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा" अशी आजची आपली अवस्था असेल. नवीन उमेद नव्या कल्पनांची पर्वणी आजचा दिवस आला आहे. म्हणूनच सकारात्मक राहा. इतरांना आनंद देत राहा.

वृषभ : खर्चावर कंट्रोल करा

"आता कशाला उद्याची बात" असा आजचा दिवस आहे. म्हणजेच काय विनाकारण मनस्वास्थ्य बिघडून घेणाऱ्या गोष्टी, भविष्याची चिंता अशा अस्वस्थतेमध्ये राहू नका. खर्चावर कंट्रोल करा.

मिथुन : कामात यश मिळेल

"आशियाना प्यार का" असा आजचा आपला दिवस आहे. प्रेम हे सर्वांच्याकडूनच मिळणार आहे. सरकारी कामे, राजकारण, समाजकारण सगळ्यांमध्ये यश अपेक्षित आहे. पुढील गोष्टीची आखणी कराल.

कर्क : कीर्ती वाढण्याचा दिवस

कामाच्या ठिकाणी आज वजन वाढेल. मानसन्मान, कीर्ती वाढण्याचा आजचा दिवस आहे. पण या गोष्टी सहज होत नाहीत, यासाठी विशेष परिश्रम आपल्याला घ्यावे लागतील.

सिंह : भगवंताचे चरण धरा

"देवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी" असा आजचा दिवस आहे. आयुष्यामध्ये काही गोष्टी मनासारख्या हवे असतील तर भगवंताचे चरण धरायला लागतील. ही अनुभूती आज येईल. म्हणूनच त्याच वाटेवर चला.

कन्या : कामामध्ये अडथळे येतील

कामामध्ये अडथळे येतील. विनाकारण आरोप प्रत्यारोपांचा आजचा दिवस आहे. म्हणून सांभाळून राहा. जीभ सांभाळा, उगाच संकटे ओढवून घेऊ नका.

तूळ : जोडीदाराची साथ मिळेल

"तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं" असा आजचा दिवस आहे. दोघं मिळून गुण्यागोविंदाने संसारातील गोष्टी कराल. वेळ असो वा नसो, आज आपल्या दोघांचे बॉण्डिंग चांगले आहे हे नक्की.

वृश्चिक : स्वभाव त्रासदायक ठरू शकतो

उगाचच काही वेळा आपला कमी बोलण्याचा जो स्वभाव आहे, हा त्रासदायक ठरू शकतो. तुमच्यामुळे गैरसमज पसरू शकतात. आपले हितशत्रू आपणच वाढवून घेऊ नका, म्हणजे झाले.

धनु : गुंतवणूक फायद्याची ठरेल

"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" असा आजचा दिवस आहे. बऱ्याच काही सृजनशील गोष्टी करण्यासाठी मन बंड करून उठेल. त्याच गोष्टी कराल. शेअर्स मधली गुंतवणूक फायद्याची ठरेल.

मकर : काळजीपूर्वक पावले टाका

जमीन जुमला, शेतीवाडी, पशुपालन या सर्व गोष्टींमध्ये काळजीपूर्वक पावले टाका. काही गोष्टी विनाकारण अंगावर येतील. कुटुंबीयांना धरून चला. वाट सुकर होईल.

कुंभ : पराक्रमाने सुखावून जाल

"या सुखांनो या" असा आजचा दिवस आहे. एकटा पथ चालून सुद्धा अनेक गोष्टीत बाजी मारून न्याल. आपल्या पराक्रमाने आपण स्वतः सुखावून जाल. शेजारी सख्य राहील. कान जपा.

मीन : विश्वास फायद्याचा ठरणार

"लिंब लोण उतरू कशी... दृष्ट काढते निमिष एक थांब तू" असा आजचा दिवस. कुटुंबीयांच्या बरोबर आजचे आपले बॉण्डिंग दृष्ट लागण्यासारखंच आहे. एकमेकांविषयी असणाऱ्या विश्वास हा पुढील वाटचालीसाठी फायद्याचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT