Today's Rashi Bhavishya 7th June 2024, Horoscope Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : 'या' राशींना कामात मिळणार यश, वाटेतील अडथळे होतील दूर; वाचा आजचं राशी भविष्य

Horoscope Today Marathi : ग्रहमानानुसार राशीपरिवर्तन होत असते, ज्यामुळे नशिबात बदल होत असतात. तुमच्या राशीत आज काय लिहलंय, वाचा आजचं राशी भविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग ७ जून २०२४

तिथी - वैशाख दर्श अमावस्या. नक्षत्र- रोहिणी. योग - धृती. करण - चतुष्पाद. रास - वृषभ. भावुका अमावस्या. शनैश्चर जयंती. दिनविशेष - अमावस्या वर्ज्य.

मेष : दिवस आनंदात जाईल.

"फिटे अंधाराचे झाले झाले मोकळे आकाश" असा आजचा दिवस आहे. यश मिळाल्यानंतर मिळालेला आनंद आज मिळणार आहे. मित्रपरिवार, स्नेही यांच्याबरोबर चार सुखाच्या गोष्टीत सहभाग घ्याल. अनेक प्रकारचे लाभ होतील.

वृषभ : देवाची उपासना करा

"कोईं हमदम नां रहां कोई सहारा ना रहां" असे आज विचार येतील. एकटेपणाची भावना वाढीस लागेल. उपासना करा. गंगादशहरारंभ आज होत आहे. गंगास्नानाने विशेष लाभ मिळतील.

मिथुन : आनंदाच्या लहरी सळसळतील

"ऋतू हिरवा ऋतू बरवा" असा आजचा दिवस आहे. सर्व गोष्टी अलबेल आणि छान वाटायला लागतील. उगाचच आनंदाच्या लहरी शरीरामध्ये सळसळतील पण ही चांगली गोष्ट आहे. त्या दृष्टीने वाटचाल करा सकारात्मक रहा.

कर्क : व्यवहार जपून करा

पैशांशी निगडित व्यवहार करताना जपून करा. कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. विनाकारण कुठे साक्षीदार राहू नका. आपल्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला जाईल. आणि म्हणून त्यासाठी आज सतर्कतेचा इशारा आहे.

सिंह : सर्वांचे सहकार्य लाभेल

"आज दिन चढेयां" असा आजचा दिवस आहे. अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्या दृष्टीने वाटचाल कराल. सर्वांचे सहकार्य लाभेल. शाब्बासकीची थाप मिळेल.

कन्या : सकारात्मक राहणं गरजेचं

सातत्याने स्वतः चिंतेत राहणे आणि इतरांना चिंता करायला लावणे हा आपला स्वभाव आहे. पण या गोष्टीला आज बगल द्या. थोडं सकारात्मक राहणं आणि घरच्यांना समजून घेणे आज गरजेचे आहे. नाहीतर मनस्ताप होऊ शकतो.

तुळ : जीवनामध्ये रंग भरेल

"हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र जाई" असा आजचा प्रणयी दिवस आपल्याला मिळालेला आहे. जीवनामध्ये रंग भरणारी आपली रास फुलपाखरू होऊन आज त्याचा आस्वाद घ्या.

वृश्चिक : अधिकारांचा योग्य वापर करा

विनाकारण कटकटी त्रास. आपले कोणी ऐकतच नाही अशी भावना होईल. पण त्रागा न करता यातून योग्य मार्ग काढणं हेच आज आपल्या हातात आहे. आपल्याकडे असणाऱ्या अधिकारांचा योग्य प्रकारे वापर करून घ्या.

धनु : कामामध्ये यश मिळेल

"सलोनां सा सजन हैं औंर मैं हुं" ही अनुभूती में एकमेकांसाठी जगण्यासाठी आजचा दिवस आहे. कामामध्ये यश मिळेल. प्रवासही घडतील. पण दिवस सार्थकी लागणार आहे.

मकर : विनाकारण अस्वस्थ वाटेल

"अजीब दांसतां हैं यें कहां शुरु कहां खतम्" अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. काही वेळेला आयुष्याचे कोडे उलगडत नाही आणि विनाकारण अस्वस्थता वाटायला लागते. म्हणून यावर मात करा. मनस्वास्थ्य जपा.

कुंभ : उपासना फलदायी ठरेल

खरंतर आपण देवावर खूप विश्वास ठेवत नाही. पण भाग्यावर विश्वास आहे. भाग्यातल्या गोष्टी कळत नाहीत. नियतीने जे दान दिले ते आज तुम्हाला मिळणारच आहे. पण मग याचे श्रेय देवाला द्यायला काय हरकत आहे? विशेष उपासना करा फल व्दिगुणित होईल.

मीन : मानसन्मान पदरी पडेल

आपले सहकारी आपल्याला घेतलेल्या कामात मदत करतील. अर्थात यासाठी त्यांना सुद्धा कामाचे श्रेय तुम्हाला वाटता आले पाहिजे. आपल्याबरोबर घेऊन इतरांना कामाला लागा. मानसन्मान पदरी पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार प्रकाश भाळसाकळे यांनी दिला सरकारला घरचा आहेर

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी, बॉम्बब्लास्टची होती प्लानिंग?

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT