Today's astrology prediction saam tv
राशिभविष्य

Today's astrology prediction: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार एकदम खास; पाहा काय आहेत आजचे शुभ मुहूर्त

Today's horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं असतं. यानुसार आजचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. आजच्या शुभ ग्रहमानामुळे या राशींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक आघाडीवर मोठे यश मिळेल.

Surabhi Jayashree Jagdish

  • 25 सप्टेंबर 2025 हा आश्विन कृष्ण प्रतिपदेचा दिवस आहे.

  • चंद्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.

  • गुरुवारचा दिवस धार्मिक दृष्ट्या शुभ मानला जातो.

आज दिनांक २५ सप्टेंबर २०२५, गुरुवार. आजचा दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार, आज आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आज सूर्य सिंह राशीत भ्रमण करत आहे आणि चंद्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, आज गुरुवार असून आजच्या दिवसाची सुरुवात करताना पंचांग, शुभ मुहूर्त आणि आज कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे, याची माहिती जाणून घेणं उपयोगी ठरते.

आजचं पंचांग

  • तारीख: २५ सप्टेंबर २०२५, गुरुवार

  • तिथी: कृष्ण पक्ष प्रतिपदा, आश्विन महिना

  • नक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (दुपारपर्यंत), त्यानंतर रेवती

  • चंद्रराशी: मीन

  • सूर्योदय: सकाळी ६:२०

  • सूर्यास्त: संध्याकाळी ६:२५

  • वार: गुरुवार

  • शुभ वेळ: सकाळी ९:०५ ते १०:३० आणि दुपारी १२:१५ ते १:४५

  • राहुकाल: दुपारी १:३० ते ३:००

आजचे शुभ मुहूर्त

आज विवाह, गृहप्रवेश किंवा नवं काम सुरू करण्यासाठी दुपारी १२:१५ ते १:४५ हा वेळ अत्यंत शुभ मानला जातोय. त्याचप्रमाणे व्यापारी व्यवहार, नवी खरेदी किंवा करार या वेळेत केल्यास यश आणि लाभ मिळू शकतो.

आजच्या दिवशी या राशींना मिळणार लाभ

मेष

आज तुमच्यासाठी दिवस खूप चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे निर्णय योग्य ठरू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून नफा तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते.

कर्क

कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार असून तुम्हाला त्यांची साथ मिळणार आहे. जुने अडथळे दूर होऊन मानसिक शांती लाभण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवी संधी मिळणार आहे. दूर प्रवासाला जाण्याचा विचार करत असला तर योजना सफल होईल.

कन्या

आजचा दिवस या राशींसाठी चांगला असून तुम्हाला आत्मविश्वास मिळणार आहे. तुमची कोणती महत्त्वाची कामं असतील तर ती पूर्ण होऊ शकतात. विशेषतः आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.

धनु

आजच्या दिवशी तुम्हाला भाग्याची साथ लाभणार आहे. नवीन प्रकल्प किंवा नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुमचा दिवश शुभ असणार आहे. सर्जनशील कार्य करणाऱ्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवन गोड राहील आणि कुटुंबातील वातावरण उत्साहपूर्ण असेल.

25 सप्टेंबर 2025 रोजी कोणती तिथी आहे?

आश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी आहे.

आज चंद्र कोणत्या राशीत प्रवेश करत आहे?

चंद्र मीन राशीत प्रवेश करत आहे.

आजचा शुभ मुहूर्त कोणत्या वेळेस आहे?

दुपारी 12:15 ते 1:45 हा शुभ मुहूर्त आहे.

आज कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे?

मेष, कर्क, कन्या आणि धनु राशींना लाभ होणार आहे.

राहुकाल कोणत्या वेळेस आहे?

दुपारी 1:30 ते 3:00 पर्यंत राहुकाल आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips For Party: जर तुम्ही मेकअप करताना ही टिप फॉलो केलीत तर न्यू ईयरच्या पार्टीत दिसाल सर्वात ग्लॅमरस

Maharashtra Live News Update : परभणीत भाजप आणि शिवसेना युती तुटली

सोलापुरातही एबी फॉर्मवरून भाजप, शिंदेसेना, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा | VIDEO

Uddhav Thackeray : मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी, सचिन शिवेकरांचा अपक्ष अर्ज दाखल

Tandoori Roti Recipe: हॉटेलसारखी तंदूरी रोटी घरी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT