Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : स्वतःचे अस्तित्व वेगळेपणाने जाणवेल, दिवसभरात भाग्यकारक घटना घडतील; तुमची रास कोणती?

Horoscope Today : आज काही राशींच्या लोकांना स्वतःचे अस्तित्व वेगळेपणाने जाणवेल, काहींच्या जीवनात भाग्यकारक घटना घडतील, वाचा तुमच्या नशीबात आज काय लिहिलंय?

Saam Tv

आजचे पंचाग

शुक्रवार,८ नोव्हेंबर २०२४,कार्तिक शुक्लपक्ष.

तिथी-सप्तमी २३|५७

रास- मकर

नक्षत्र-उत्तरषाढा

योग- शूल ०८|२७

गंड-३०|३८

करण- गरज

दिनविशेष-शुभदिवस

मेष - कामासाठी प्रवास, भटकंती, वणवण, त्रास या सगळ्या गोष्टी आज संभवत आहेत. पण आपल्या वरिष्ठांच्या कडून त्याचे विशेष कौतुक होईल. आपले कामाचे योगदान आपल्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल.

वृषभ - कलासक्त आयुष्य असावे असे वाटेल. लक्ष्मी उपासना विशेष फलदायी ठरेल. निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे योग येतील. आजूबाजूच्या लोकांच्या सहकार्यामुळे भाग्यकारक घटना घडतील.

मिथुन- प्रेमात अपयश मिळेल. मनस्थिती खराब राहील. स्वतःला थोडे बदलावे लागेल. आपल्यासारखे जग चांगले नसते हे जाणवेल. तरी सुद्धा आजच्या दिवसात आपल्यातील खिलाडू वृत्ती जागृत ठेवा.

कर्क - जोडीदाराबरोबर बद्दल अभिमान वाटावा अशा काही गोष्टी आज घडतील. एकमेकांची मान उंचावेल असे प्रेम राहील. आयुष्यामध्ये सुसंधी येतील. त्याचे सोने करा.

सिंह- मामा कडून विशेष फायदा होण्याचा आजचा दिवस आहे. त्याचबरोबर अडचणीही काही आहेत. आपल्या वस्तू, जिन्नस सांभाळा. नोकर वर्गापासून सावधगिरी बाळगावी.

कन्या - विशेष विष्णू उपासना आज फळाला येईल. जप,मंदिरामध्ये दर्शन या गोष्टी करा. पैशांमध्ये वाढ होईल. धन संचय चांगला राहील. कलेला प्रेरित दिवस आहे.

तुळ- गृहसौख्य, वाहनसौख्य, मातृसौख्य या दृष्टीने दिवस चांगल्या गोष्टी देणारा आहे. आपल्या मार्गाने जात राहा. प्रेमाने इतरांच्या सर्व गोष्टी करा. समाधान भंग झाले तरी होऊ देऊ नका.

वृश्चिक - लहान प्रवास घडतील. प्रवासामध्ये अडचणी येऊन ठेपतील. पण यावर मात कराल. आपल्यातला एक वेगळा आयाम तुम्हाला भारून टाकेल. दिवस भारलेला राहील.

धनु - गोडधोडाच्या पंगती उठतील.कुटुंबीयांमध्ये एखादे छोटे कार्य घरामध्ये पार पडेल. पाहुण्यांची ऊठबस राहील. ठरलेल्या गोष्टी सहज पार पडतील.

मकर - उदासी आणि मरगळ आज झटकून टाका. नवीन काहीतरी कपडे किंवा अलंकार खरेदी होईल. स्वतःचे अस्तित्व वेगळेपणाने जाणवेल. अंर्तमग्न व्हाल.

कुंभ - अनाठही पैसा खर्च होईल. काही मुद्द्यांवर इतरांशी विनाकारण वाद होतील. स्वतःची वाणी जपा तर जीवनाचा ताल तुम्हाला जपेल.

मीन - मित्रांच्या सहकार्याने मन भरून येईल. वेळेला अडचण असेल तरीसुद्धा कोणाची तरी मदत होईल. प्रेमामध्ये लाभ आहेत. तर लाभातच प्रेम आहे. या दोन्ही गोष्टी आज जाणवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT