Shani Vakri 2024 Saam Tv
राशिभविष्य

Shani Vakri : 15 नोव्हेंबरपर्यंत शनी देव चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. यामध्ये शनी देव यांचा देखील समावेश आहेत. शनीच्या प्रत्येक हालचालीचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो.

कर्म दाता शनिदेवाने 30 जून रोजी वक्री अवस्थेत प्रवेश केला होता. अशावेळी नवरात्री, दसरा आणि दिवाळीलाही शनीदेव वक्री अवस्थेत राहणार आहेत. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत वक्री आहेत. 15 नोव्हेंबरपर्यंत ते प्रतिगामी अवस्थेत राहणार असून या काळात काही राशींची चांदी होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

शनिदेवाची वक्री चाल तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. या काळात नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. करिअरमध्ये प्रगती होईल आणि हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. भविष्यात तुम्हाला त्यांचा मोठा फायदा होणार आहे. मालमत्तेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.

मेष रास

शनिदेवाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकणार आहे.उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. व्यावसायिक लोक नफा मिळवू शकतात. आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ मिळू शकणार आहे.

कुंभ रास

शनिदेवाची वक्री गती तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. जर तुम्ही नवीन नोकरीची योजना आखत असाल तर यावेळी तुमच्या आवडीची नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचे लोकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत. नवीन करार होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: बांगलादेशची खैर नाय! टी-20 मालिकेत टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू एकटा नडणार

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी कॅाग्रेस शरद पवार पक्षातील प्रवेश देखील खडतर ठरण्याची शक्यता

Parbhani News : नाफेडची १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी; परभणी जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र

Tharala Tar Mag Actress: नवऱ्याच्या, लेकीच्या कारने खूप फिरले आता स्वत:ची हवी; 68 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण

Navratri Trending Songs: एकदा वाजवून तर बघा ; नवरात्रीत ही धुमाकूळ घालणारी गाणी

SCROLL FOR NEXT