March 2025 Triple Rajyog saam tv
राशिभविष्य

Mahalaxmi Rajyog: ६ एप्रिलपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; महालक्ष्मी राजयोगामुळे मिळणार पैसाच पैसा

चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य चमकण्याची शक्यता आहे. या राशींना अनपेक्षित धनलाभ आणि सुख मिळण्याची आशा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी गोचर करतात आणि शुभ राजयोग निर्माण करतात. मंगळ ३ एप्रिल रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर ६ एप्रिल रोजी चंद्र कर्क राशीत गोचर करणार आहे. ज्यामुळे चंद्र आणि मंगळाची कर्क राशीत युती होणार आहे.

चंद्र आणि मंगळाच्या युतीने महालक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत काही राशींचे नशीब उजळू शकणार आहे. या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते जाणून घेऊया.

वृश्चिक रास

महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला प्रलंबित कामांमध्ये यश मिळणार आहे. तुम्हाला नशीबाची साथ मिळणार आहे. तुम्ही काम आणि व्यवसायासाठी देशात आणि परदेशात देखील प्रवास करू शकणार आहात. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळू शकणार आहे.

तूळ रास

महालक्ष्मी राज योगाची निर्मिती तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात नोकरी करणाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल चर्चा होणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. समाजात आदर आणि सन्मान वाढू शकणार आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकणार आहे.

कन्या रास

महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी तयार होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT