Ketu Gochar saam tv
राशिभविष्य

Ketu Gochar 2024: डिसेंबर महिन्यात 'या' ३ राशी होणार कंगाल; केतूच्या गोचरने काहींच्या आयुष्यात येणार भूकंप

Ketu Gochar 2024: केतूच्या नक्षत्र गोचरचा परिणाम काही राशींवर अशुभ पडू शकतो. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एका खास महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये केतू ग्रहाला विशेष महत्त्व असून त्याच्या संक्रमणाचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होत असतो. केतू हा पापी ग्रह नेहमी वक्री अवस्थेत फिरतो.

वैदिक ज्योतिषाच्या गणनेनुसार, सोमवारी 2 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 04:04 वाजता, गोचर केतूने हस्त नक्षत्र सोडलं असून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केलाय. केतूच्या नक्षत्र गोचरचा परिणाम काही राशींवर अशुभ पडू शकतो. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतंय.

मेष रास

मेष राशीच्या लोकांवर स्पष्ट केतूच्या गोचरचा अशुभ प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या काळात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. नुकतंच लग्न झालं असेल त्यांच्या नात्यात लवकरच दुरावा येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाच्या स्रोतात घट होण्याची शक्यता आहे. यावेळी व्यावसायिकांसाठी घर खरेदीचा निर्णय योग्य ठरणार नाही.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना शिक्षणासंबंधित व्यवसायात यश मिळणार नाही. या काळात तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. विवाहित जोडप्याच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांचे त्यांच्या बॉस आणि सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबामध्ये मोठी घडामोड घडू शकते.

मीन रास

जर तुमची राशी मीन असेल तर तुम्हाला संपूर्ण डिसेंबर महिन्यात खूप काळजी घ्यावी लागणार आहे. जे लोक स्वतःच्या वाहनाने ऑफिसला जातात त्यांनी गाडी चांगली चालवावी. भविष्यात व्यावसायिकांच्या नफ्यात घट होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वाद होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT