Zodiac Signs saam tv
राशिभविष्य

Zodiac Signs: २६ नोव्हेंबरपर्यंत 'या' राशींचा खिसा राहणार पैशांनी भरलेला; प्रत्येक गोष्टीत मिळणार यश

Zodiac Signs: बुध अनुराधा नक्षत्रातून बाहेर पडून ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या चालीमुळे काही राशींना सुख मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. यावेळी बुध ग्रह गोचर प्रमाणे वक्री चाल देखील चालतो. ज्यावेळी बुध आपली राशी आणि नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा 12 राशींच्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. बुध हा संवाद, वाणी, बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि मित्र यांचा दाता मानला जातो. या महिन्यात बुध ग्रह वक्री चाल चालणार आहे.

वैदिक कॅलेंडरनुसार, बुध 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 08:11 वाजता वक्री चालणार आहे. यावेळी बुध दोनदा नक्षत्र बदलेल. 1 नोव्हेंबर 2024 रोजी बुध अनुराधा नक्षत्रात सकाळी 06:46 वाजता प्रवेश करणार आहे. यानंतर 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:29 वाजता बुध अनुराधा नक्षत्रातून बाहेर पडून ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या चालीमुळे काही राशींना सुख मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मिथुन रास

बुध नक्षत्र दोनदा बदलणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकणार आहे. नोकरदार लोकांच्या कामाची क्षमता वाढल्याने कामावरही सकारात्मक परिणाम होईल. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.

सिंह रास

बुध ग्रहाच्या विशेष कृपेने सिंह राशीच्या लोकांची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांच्या कामात वाढ झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाच्या स्थितीतील बदल फायदेशीर ठरणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी यावेळी मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. भविष्यात भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक तुमच्या हाती भरपूर पैसा येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT