Samsaptak Yog saam tv
राशिभविष्य

Samsaptak Yog: मंगळ-शुक्राच्या युतीने 'या' राशींवर घोंगावणार संकट; करियरच्या संधी निसटणार, आजारही लागणार मागे

Samsaptak Yog 2024: गुरुवारी 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:13 वाजता मंगळ आणि शुक्र एकमेकांपासून सातव्या घरात स्थित होते, ज्यामुळे समसप्तक योग तयार झाला.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करणार आहे. शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. शुक्र प्रेम, संपत्ती यांचा कारक मानला जातो. तर मंगळ हा धैर्य, शौर्य, भूमी, रक्त, ऊर्जा, युद्ध, सेना, सामर्थ्य आणि शौर्य यांचा कारक मानला जातो.

वैदिक पंचांगानुसार, गुरुवारी 12 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:13 वाजता मंगळ आणि शुक्र एकमेकांपासून सातव्या घरात स्थित होते, ज्यामुळे समसप्तक योग तयार झाला. दोन ग्रह एकमेकांपासून १८० अंशांवर असताना हा योग तयार होतो.

समसप्तक योगाचा काही राशींच्या व्यक्तींवर राशींवर शुभ प्रभाव पडत असला तरी काही वेळा हा योग काही लोकांसाठी हानिकारक ठरला आहे. यावेळी समसप्तक योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींच्या समावेश आहे.

वृषभ रास

शुक्र-मंगळाच्या समसप्तक योगाचा वृषभ राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव राहणार आहे. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाने यावेळी नवीन योजना राबवणं नुकसानीचं ठरेल. नफा वाढण्याऐवजी कमी होऊ शकतो. प्रेम जीवनात समस्या उद्भवू शकतात. घरातील वातावरण तणावाचं राहण्याची शक्यता आहे.

मकर रास

शुक्र-मंगळाच्या समसप्तक योगाच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. काळजी घेतली नाही तर आरोग्यही बिघडू शकतं. जोडीदाराशी भांडण झाल्यामुळे मकर राशीच्या लोकांचा मूड काही दिवस खराब राहणार आहे. तरुणांना करिअरची चिंता सतावणार आहे.

कुंभ रास

आयुष्यात काय करावं आणि काय करू नये, याची चिंता तरुणांना सतावणार आहे. वडिलांसोबत मतभेद होण्याचीही शक्यता आहे. प्रेम जीवनातील सुख-शांती बाधित होऊ शकतं. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. बऱ्याच काळापासून काम करत असलेल्या लोकांची नोकरी जाऊ शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT