Shukraditya Yoga saam tv
राशिभविष्य

Shukraditya Rajyog: अचानक पालटणार 'या' राशींचं नशीब; शुक्रादित्य राजयोगामुळे बरसणार पैसा

Shukraditya Rajyog 2025 Impact on Zodiac Sign: जून महिना ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचा असणार आहे. जून महिन्यात शुक्र आणि सूर्य एक राजयोग तयार करणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात असं ज्योतिष्य शास्त्रात म्हटलं आहे. जून महिन्यात सूर्य देव आणि शुक्र यांची युती होईल. सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे 'शुक्रादित्य राजयोग' निर्माण होणार आहे.

सूर्य आणि शुक्राच्या या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत. तर यावेळी काही राशींना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. कोणत्या राशींना यावेळी चांगला लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग फायदेशीर ठरणार आहे. याच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती निश्चित आहे. व्यवसायात उत्पन्न वाढणार आहे. यावेळी नवीन सौदे मिळाल्याने व्यवसायात संतुलन येणार आहे. विवाहित जीवन जगणाऱ्या लोकांच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढणार आहे.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग आर्थिक प्रगती आणणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांची रखडलेली कामं पूर्ण होणार आहेत. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीत जन्मलेल्या लोकांना शुक्रादित्य राजयोगाच्या शुभ प्रभावाचा खूप फायदा होणार आहे. यावेळी या राशीच्या लोकांना कारकिर्दीत अनेक मोठे फायदे पहायला मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT