Navpancham Rajyog saam tv
राशिभविष्य

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Navpancham Rajyog 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट काळात आपली स्थिती बदलतो, ज्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. धन, व्यापार आणि बुद्धीचा कारक मानला जाणारा ग्रह बुध (Mercury) एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग तयार करणार आहे, ज्याला 'यम नवपंचम राजयोग' (Yam Navapancham Raj Yog) असे म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा नवग्रहांमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. त्याला ग्रहांचा राजकुमार असंही म्हटलं जातं. बुध हा बुद्धी, विचारशक्ती, तर्कबुद्धी, मान-सन्मान यांचा अधिपती मानला जातो. बुध महिन्यात दोनदा राशी परिवर्तन करतो. सध्या बुध आपली स्वराशी म्हणजे कन्या राशीत विराजमान आहे. या अवस्थेत तो इतर ग्रहांसोबत युती करत राहतो.

लवकरच बुध आणि यम यांच्या संयोगातून नवपंचम राजयोगाची निर्मिती होणार आहे. या विशेष योगामुळे काही राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय, आर्थिक लाभ आणि आनंद यांचं वरदान मिळू शकते. वैदिक ज्योतिषानुसार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी बुध आणि यम हे एकमेकांपासून 120 अंशांवर येणार आहे. यम मकर राशीत विराजमान असणार आहेत. त्यामुळे नवपंचम राजयोगाची निर्मिती होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध-यम नवपंचम राजयोग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. या काळात संतानाकडून शुभवार्ता मिळणार आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. परदेशगमनाचेही योग निर्माण होणार आहेत. व्यापारी वर्गाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि गुंतवणुकीतून नफा होणार आहे.

कन्या राशि

कन्या राशीत सध्या बुध लग्नात तर यम पाचव्या भावात आहेत. अशा स्थितीत तयार होणारा नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांसाठी मोठ्या प्रगतीचे संकेत देतो. नोकरीच्या संधी वाढतील तसंच व्यापारातही चांगलं उत्पन्न होणार आहे. स्पर्धकांना मागे टाकून यश मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक समाधान लाभणार आहे.

तूळ राशि

तूळ राशीत बुध बाराव्या भावात तर प्लूटो चौथ्या भावात विराजमान राहतील. या संयोगातून तयार होणारा नवपंचम राजयोग तूळ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ देऊ शकणार आहे. घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. पालकांचा पाठिंबा लाभणार आहे. ज्यामुळे ध्येय साध्य करणे सुलभ होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल आणि स्थिरता मिळेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT