Budh Gochar  saam tv
राशिभविष्य

Budh Gochar: 4 जानेवारीपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; मिळणार दुप्पट वेगाने पैसा आणि प्रतिष्ठा

Budh Gochar 2025: ग्रहांचा राजपुत्र ठराविक काळानंतर त्यांची राशी बदलतो. बुध 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:11 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने नवं वर्ष खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे या वर्षात अनेक ग्रह त्यांच्या स्थितीत बदल करणार आहे. या ग्रहांमध्ये ग्रहांचा राजपुत्र ठराविक काळानंतर त्यांची राशी बदलतो. ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच दिसून येतो.

सध्या बुध वृश्चिक राशीत असून तो 2025 च्या सुरुवातीला गोचर करणार आहे. बुध 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:11 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. धनु राशीत बुध ग्रहाच्या आगमनामुळे काही राशीच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. तर या काळात काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. या काळात कोणत्या राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे, ते पाहूयात.

सिंह रास

या राशीत बुध पाचव्या भावात प्रवेश करणार असून या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्ही आनंदी होणार आहात. नोकरीच्या ठिकाणीही तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.

तूळ रास

या राशीत बुध तिसऱ्या भावात प्रवेश करणार असून अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना उत्कृष्ट लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या कामाचं खूप कौतुक होणार आहे. व्यवसायातील तोटा आता संपुष्टात येणार आहे. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

मकर रास

बुध ग्रहाचं गोचर मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. बुधामुळे तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकणार आहे. तुम्हाला थोडे जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT