Guru Gochar 2025 Jupiter Planet saam tv
राशिभविष्य

Guru Uday: ९ जुलैपासून चमकणार ३ राशींचं नशीब; गुरु ग्रहाच्या उदयाने होणार लाभ

Guru Rise 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर आणि त्यांची स्थिती व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकते. देवगुरु बृहस्पती हा ज्ञान, धन, विवाह, सौभाग्य आणि समृद्धीचा कारक मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह हे गोचर प्रमाणे उदय आणि अस्त देखील होतात. ज्यावेळी एखादा ग्रह अस्त किंवा उदित होतो तेव्हा त्याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होत असतो. येत्या काळात ज्ञान देणारा गुरु ७ जुलै रोजी उदयाला येणार आहे.

कोणताही ग्रह सूर्याच्या अगदी जवळ आल्यावर अस्त होतो. याउलट कोणताही ग्रह जेव्हा सूर्यापासून दूर जातो तेव्हा त्याचा उदय होतो. त्यामुळे गुरु उदयाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. मात्र यामध्ये काही अशा राशी आहेत, ज्यांना याचे विशेष परिणाम मिळू शकणार आहेत. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

सिंह रास

तुमच्या कुंडलीच्या उत्पन्न आणि नफ्याच्या ठिकाणी गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे या वेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नवीन मालमत्तेत गुंतवणूक केल्याने फायदे होऊ शकतात. या काळात तुम्हाला नोकरी किंवा नवीन प्रकल्पात पदोन्नती मिळू शकणार आहे.

कन्या रास

गुरु ग्रहाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकणार आहे. तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. गुरु ग्रहाच्या उदयामुळे तुमची कार्यशैली देखील सुधारणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रकल्प किंवा काम पूर्ण होणार आहेत.

वृषभ रास

गुरु गुरूचा उदय तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकणार आहे. गुरु तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानावर उगवणार आहे. ज्याला धन आणि वाणीचं घर म्हटलं जातं. तुम्हाला धार्मिक यात्रा किंवा दानधर्माच्या संधी देखील मिळू शकणार आहे. तुमच्या मनाला शांती मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

Kalyan Accident News : कल्याणमध्ये भीषण अपघात! विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी भरधाव रिक्षा उलटली, ६ जण गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

SCROLL FOR NEXT