Chandra Grahan 2025 saam tv
राशिभविष्य

Chandra Grahan 2025: 'या' दिवशी लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

Last lunar eclipse of the year: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण विशेषतः काही राशींसाठी अत्यंत शुभ मानले जाते. या ग्रहणामुळे त्यांच्या भाग्यात मोठे बदल घडून येतील आणि अचानक धनलाभाचे योग तयार होतील.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या वर्षीचं शेवटचं आणि दुसरा चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार असल्याने यावेळी सूतक काल देखील असणार आहे. हे ग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला लागणार आहे आणि त्याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात होणार आहे. यावेळी चंद्र शनीच्या कुंभ राशीत आणि पूर्वाभाद्रपद व शतभिषा नक्षत्रात असेल.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या ग्रहणाचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसणार आहे. मात्र त्यातील तीन राशींना विशेष सकारात्मक लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींना याचा फायदा मिळणार आहे पाहूयात.

चंद्रग्रहण २०२५ तारीख आणि वेळ

  • या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण खास असणार आहे कारण ते ब्लड मून स्वरूपात दिसेल.

  • ग्रहणाची सुरुवात- ७ सप्टेंबर रात्री ९:५७ वाजता

  • स्पर्शकाल- रात्री ११:०९ वाजता

  • मध्यकाल- रात्री ११:४२ वाजता

  • मोक्षकाल- ८ सप्टेंबर पहाटे १२:२३ वाजता

  • समाप्ती- पहाटे १:२६ वाजता

हे ग्रहण एकूण सुमारे ४ तास असून भारतात स्पष्टपणे दिसेल.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अनेक नवे मार्ग खुले करणार आहे. यावेळी जुन्या अडथळ्यांवर मात करून यश मिळण्याची संधी येणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. कुटुंबीय आणि मित्रांचा पाठिंबा तुम्हाला लाभणार आहे. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्येही यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे.

धनु राशी

धनु राशीसाठी हे चंद्रग्रहण अत्यंत शुभ मानलं जातं. मनातील अनेक इच्छापूर्तीची दारे खुली होतील. करिअरमध्ये उंची गाठण्याची संधी मिळणार आहे. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील आणि मोठा नफा मिळणार आहे. वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधात गोडवा वाढणार आहे. विद्यार्थी वर्गासाठीही ही वेळ यश मिळवून देणारी असणार आहे.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्षातील सर्वात लाभदायक चंद्रग्रहण मानलं जातं. नोकरी-व्यवसायात प्रगती होणार आहे. दीर्घकाळचा मानसिक ताण आणि क्लेश कमी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि प्रमोशन मिळणार आहे. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांची मागणी; ओबीसी नेते आक्रमक

Shocking : पायात सँडल घातली, अन् घात झाला; विषारी सापाच्या दंशाने इंजिनीअरचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढणार? मसुद्याला अंतिम रूप देण्याच्या हालचाली

IBPS RRB Vacancy: सरकारी नोकरीची संधी! बँकेत लिपिक ते PO च्या १३,२१७ पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

TET Exam : टीईटी गैरप्रकाराचा धसका; आता शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार, VIDEO

SCROLL FOR NEXT