June 2025 Grah Gochar Rashifal saam tv
राशिभविष्य

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Mangal ketu Yuti 2025: मंगळ हा ऊर्जा, आक्रमकता आणि साहसाचा ग्रह आहे तर केतू हा गूढता, अचानक घडणाऱ्या घटना आणि विरक्तीचा कारक आहे. या दोघांच्या एकत्र येण्याने जीवनात अचानक अडथळे, अपघात, मानसिक तणाव आणि निर्णय घेताना गोंधळ निर्माण होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करून अनेक योग तयार करतात. यापैकी काही योग हे शुभ किंवा अशुभ असतात. ७ जून रोजी मंगळ आणि केतुचr अशुभ युती झाली होती. ही युती १८ वर्षांनी सिंह राशीत झाली आहे.

तर काल म्हणजेच २८ जुलै रोजी ग्रहांचा अधिपती मंगळ कन्या राशीत प्रवेश केला होता. ज्यामुळे ही अशुभ युती संपली आहे. अशा परिस्थितीत आता काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. त्याचबरोबर या राशींना मानसिक शांती, वैवाहिक जीवनात गोडवा मिळू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना हा फायदा मिळू शकणार आहे ते पाहूयात.

सिंह रास

या राशींसाठी मंगळ आणि केतूच्या अशुभ युतीचा शेवट फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण ही युती तुमच्या राशीच्या लग्नात तयार झाली होती. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत जे संबंध बिघडत होते ते सुधारणार आहेत. पार्टनरशिपच्या कामात तुम्हाला फायदा होणार आहे. त्याचसोबत बिघडलेली कामं पूर्ण होणार आहेत.

तूळ रास

मंगळ आणि केतूची अशुभ युती संपणार आहे. यावेळी तूळ राशीच्या लोकांसाठी ही स्थिती अनुकूल ठरू शकणार आहे. कारण ही युती तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि नफा स्थानात तयार होणार आहे. यावेळी तुम्हाला दैनंदिन उत्पन्नात वाढ दिसून येणार आहे. यावेळी फायदा मिळण्यासोबतच तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

कर्क रास

मंगळ आणि केतुच्या युतीचा शेवट कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. ही युती तुमच्या राशीच्या धनस्थानावर तयार होत होती. त्यामुळे आता तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगेंच्या आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनामुळे भीषण वाहतूक कोंडी; चेंबूरमध्ये रस्त्यावर तब्बल ५ हजार वाहनं अडकली, VIDEO

Politics : अरविंद केजरीवालांना मोठा झटका, आपच्या मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

Maharashtra Politics: सामान्य मुंबईकरांचा काय दोष? चंद्रकांत पाटील यांची मनोज जरांगेंना हात जोडून विनंती

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय ओबीसी महासंघाला संविधान चौकात आंदोलनांस परवानगी

SCROLL FOR NEXT