Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar 2026: 2026 साली या राशींचं भाग्य उजळणार; नवी नोकरी पैसा मिळून तुम्ही होणार करोडपती

ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ हे वर्ष अनेक राशींसाठी अत्यंत शुभ आणि आर्थिक प्रगतीचे ठरणार आहे. विशेषतः गुरु आणि शनी या दोन मोठ्या ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशींच्या नशिबात 'राजयोग' निर्माण होत आहे

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात शनी देवांना कर्मफलदाता आणि न्यायप्रिय देवता म्हणून ओळखलं जातं. शनी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. याशिवाय, शनी देव साधारणपणे दीड-दोन वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात.

मार्च 2025 मध्ये शनी देवांनी मीन राशीत प्रवेश केला होता आणि ते या राशीत 2027 पर्यंत विराजमान राहणार आहेत. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, मीन राशीत गोचर करताना शनी जर एखाद्या जातकाच्या जन्म राशीपासून 2, 5 किंवा 9 व्या स्थानी असतील, तर त्या व्यक्तीवर शनीचा चांदीचा पाया तयार होतो. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणारे ते पाहूयात

कर्क राशि

2026 मध्ये शनीच्या चांदीच्या पायामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ मजबूत पाया घालणारा ठरणार आहे. यामुळे तुमचं करियर खूप चांगलं होणार आहे. प्रमोशन मिळेल आणि पैशांशी संबंधित निर्णयांमध्ये स्पष्टता येईल. बराच काळ अडकलेला गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित एखादा काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कमी संघर्षाचं असणार आहे. शनीची ऊर्जा तुम्हाला जमीन, घर किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णयांमध्ये लाभ देणार आहे. जुने नातेसंबंध किंवा कौटुंबिक मतभेद संपुष्टात येऊ शकणार आहेत. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थींना लक्ष केंद्रित करण्यात मदत होईल.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी शनीचा चांदी पाया करिअर आणि प्रतिष्ठा मजबूत करणारा ठरणार आहे. 2026 मध्ये तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू शकणार आहे. वरिष्ठांचा पाठिंबा मिळू शकणार आहे. एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट, पदोन्नती किंवा जबाबदारीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणाहून चांगले पैसे मिळतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवार पूजेची मांडणी आणि कलश स्थापना कशी करावी?

Train Accident: मोठा रेल्वे अपघात, ट्रेनच्या धडकेत ११ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : डोंबिवली फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता बॅनर वॉर पेटले

Shocking : माणुसकीचा अंत! २० चिमुकल्यांना डांबले अन् मिटिंगसाठी गेल्या, अंगणवाडी सेविकेचा भावनाशून्य कारभार | VIDEO

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेना फुटीवेळी 'त्या' आमदाराने शिंदेंकडून ५० कोटी घेतले, भाजप आमदाराचा दावा

SCROLL FOR NEXT