Surya Ketu Shukra Yuti saam tv
राशिभविष्य

Surya Ketu Shukra Yuti: सूर्य, शुक्र आणि केतुचा संयोग भरणार तुमची तिजोरी; 'या' राशींना धनलाभासोबत सर्व कामात मिळणार यश

Surya Ketu Shukra Yuti : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य, शुक्र आणि केतूचा संयोग होणार आहे. हा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे एकाच राशीत दोन किंवा तीन ग्रहांची युती होते. ग्रहांचा हा संयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरतो. या काळात सूर्य, शुक्र आणि केतूचा संयोग होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य 18 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये शुक्र आणि केतू हे ग्रह आधीच उपस्थित आहेत. त्यामुळे सूर्याच्या गोचरमुळे कन्या राशीत या ३ ग्रहांचा संयोग होणार आहे. हा संयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

तूळ रास

शुक्र, सूर्य आणि केतू यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर या काळात पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होऊ शकणार आहे.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र, सूर्य आणि केतू यांची युती अनुकूल ठरू शकणार आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकणार आहे. यावेळी ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.

कन्या रास

शुक्र, सूर्य आणि केतू यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तसंच तुमचा सन्मान वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. कुटुंबात सुख-शांती राहणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

SCROLL FOR NEXT